Home /News /sport /

T20 मध्ये होणार सिक्सचा वर्षाव! युवराज, डीव्हिलियर्स आणि गेल खेळण्याच्या तयारीत

T20 मध्ये होणार सिक्सचा वर्षाव! युवराज, डीव्हिलियर्स आणि गेल खेळण्याच्या तयारीत

युवराज सिंह (Yuvraj Singh) क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. युवराजसह एबी डीव्हिलियर्स (AB De Villiers) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) लवकरच एका टी20 लीगमध्ये खेळण्याच्या तयारीत आहेत.

    मुंबई, 26 जून : भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. युवराजसह एबी डीव्हिलियर्स (AB De Villiers) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) लवकरच एका टी20 लीगमध्ये खेळण्याच्या तयारीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमक बॅट्समन अशी ओळख असलेले हे दिग्गज मेलबर्नमधील एका टी20 लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. युवराज आणि गेल यांच्याशी याबाबत बोलणी सुरु असून त्याला 85 ते 90 टक्के यश मिळालं असल्याचा दावा मेलबर्नमधील क्रिकेट क्लबनं केला आहे. हे दिग्गज खेळाडू कोणत्या टीमकडून खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मेलबर्नमधील इस्टर्न क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळणाऱ्या मुलग्रेव क्रिकेट क्लबनं हा दावा केला आहे. याबाबत ब्रायन लारा, डीव्हिलियर्ससह आणखी काही बड्या क्रिकेटपटूंशी बोलणी सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटला चालना देण्यासाठी या खेळाडूंनी स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. श्रीलंकन दिग्गजांचा सहभाग निश्चित श्रीलंकेचे तिलकरत्ने दिलशान तसंच उपूल थरंगा यांनी यापूर्वीच या क्लबशी करार केला आहे. तर सनथ जयसूर्या मुख्य प्रशिक्षक असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दिलशान ऑस्ट्रेलियामधधील मेलबर्नमध्येच स्थायिक झाला आहे. त्याने मागील टी20 लीगमध्ये मुलग्रेव क्लबकडून खेळताना 6 टी20  सामन्यात 132 रन काढले होते. WTC Final : विल्यमसनच्या एका ‘मास्टस्ट्रोक’ नं टीम इंडियाचा पराभव मुलग्रेव क्लबचे अध्यक्ष मिलन पुलेनयेगम (Milan Pullenayegam) यांनी ‘क्रिकेट डॉट एयू’ ला बोलताना सांगितले की, आम्ही दिलशानशी चर्चा केली आहे. तसंच जयसूर्या आणि थरंगा यांचाही होकार मिळवलाय. युवराजशी देखील बोलणी सुरू आहे. याबाबत आम्हाला सकारत्मक संकेत मिळाले आहे. आता फक्त काही गोष्टींची पूर्तता करणे बाकी आहे.”
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Yuvraj singh

    पुढील बातम्या