बाॅल बॅटला लागला नाही, ना स्टंपला, तरीही खेळाडू आऊट !

बाॅल बॅटला लागला नाही, ना स्टंपला, तरीही खेळाडू आऊट !

हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा...ही विकेट गेली कशी...

  • Share this:

 15 नोव्हेंबर : युवराज सिंहने अलीकडेच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओत बाॅल बॅटला लागला नाही, पण तरीही अंपायरने बॅट्समनला आऊट दिलंय. हा व्हिडिओ पाहुन खुद्द युवराजही हैराण आहे.

तर आता विकेट कशी गेली हे तुम्हाला सांगणार आहोत. हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा...ही विकेट गेली कशी...बॅट्समननी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा बॉल सोडलाय पण तरीही अंपायरनं बॅट्समनला आऊट दिलंय.

2007 मध्ये झालेला हा एक प्रदर्शनीय सामना आहे. आणि या सामन्याचा नियम होता, खेळता येणारे दोन बॉल्स, जर बॅट्समननी सलग न खेळता सोडले तर तो आऊट...हो...म्हणजे सलग दोन बॉल बॅट्समन न खेळता सोडू शकत नाही. आणि या बॅट्समनकडून हीच चूक झाली....त्याने सलग दोन बॉल सोडले आणि त्याला अंपायरनी बाद दिलं.

युवराज सिंगनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतलं उत्तर त्याच्या फॉलोअर्सलाही शोधायला जमलं नाही. थोडक्यात काय क्रिकेटचे नियम असे गमतीदारही असू शकतात..

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading