मुंबई, 1 जानेवारी : भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहला (Yuvraj Singh) देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची आशा होती. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नियमांवर बोट ठेवत ही परवानगी नाकारली. BCCI च्या या निर्णयावर युवराजची अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्याचवेळी युवराजचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांनी या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं आहे.
काय म्हणाले योगराज?
योगराज सिंह ‘एशियानेट न्यूज’शी बोलताना म्हणाले की, “ माजी खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळाली तर त्याचा तरुण खेळाडूंना फायदा होईल. माझी या विषयावर युवराजशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे मला नेमकं कारण माहिती नाही. मात्र माझ्या मते हे सर्व BCCI च्या मर्जीवर आहे. वरिष्ठ खेळाडूंकडून नव्या खेळाडूंना खूप काही शिकायला मिळतं.
(हे वाचा: विराट, स्मिथला मागं टाकल्यानंतर विल्यमसनची सर्वांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया)
आयपीएल (IPL) स्पर्धेच्या पूर्वी आम्ही एक कँप घेतला होता. त्यामध्ये आम्ही युवराजला खेळण्याची सूचना केली होती. युवराजनं तरुण खेळाडूंसोबत चार-पाच इनिंग खेळल्या. तो चांगल्या फॉर्मात होता. त्याचा खेळ पाहून तरुण खेळाडूही आश्चर्य चकित झाले होते,’’ असं योगराज यांनी सांगितलं.
युवराजला का नाकारली होती परवानगी
पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी युवराजला निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचं आवाहन केलं होतं, यानंतर युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीत निवड झाली होती. पण निवड समितीने युवराजला 20 सदस्यीय टीममध्ये संधी दिली नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार परदेशामध्ये लीग खेळणाऱ्या खेळाडूंना भारताकडून स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येत नाहीत, त्यामुळे युवराजला निवृत्तीतून पुनरागमन करायला बीसीसीआयने परवानगी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे. युवराज सिंग हा कॅनडामध्ये झालेल्या लीगमध्ये खेळला होता.
अन्य खेळाडूंबद्दल धोरण काय?
BCCI नं यापूर्वी प्रवीण तांबेला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारली होती. प्रवीण यापूर्वी T10 स्पर्धा खेळला होता. त्याचबरोबर हरभजन सिंगनंही 2019 मध्ये ‘द हंड्रेड’ सीरिजमधून नाव मागं घेतलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Yuvraj singh