Home /News /sport /

मुलासाठी काहीही... टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनची स्टोरी आहे खास, कुटुंबाचा त्याग वाचून तुम्ही कराल सलाम!

मुलासाठी काहीही... टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनची स्टोरी आहे खास, कुटुंबाचा त्याग वाचून तुम्ही कराल सलाम!

देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यातच कॅप्टनसी करण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. दिल्लीतील जनकपुरी भागात राहणाऱ्या यश ढूलच्या (Yash Dhull) बाबतीमध्ये हेच घडले. त्याच्या या यशात कुटुंबाने केलेल्या त्यागाचे मोठे योगदान आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 डिसेंबर :  देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यातच कॅप्टनसी करण्याची संधी मिळाली तर त्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. दिल्लीतील जनकपुरी भागात राहणाऱ्या यश ढूलच्या (Yash Dhull) बाबतीमध्ये हेच घडले. यूएईमध्ये होणाऱ्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत (Under-19 Asia Cup) तो टीम इंडियाची कॅप्टनसी करणार आहे. या टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाल्यानंतर यशने 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना त्याच्यासाठी कुटुंबाने केलेल्या त्यागाची माहिती सांगितली आहे. माझं करिअर आत्ताच सुरू झाले आहे. मी प्रामाणिकपणे खेळत राहिलो तर नक्कीच चांगले यश मला मिळेल, असे यश म्हणाला. मी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली त्यावेळी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या कुटुंबाने मोठा त्रास सहन केला आहे. त्यांच्या कष्टाचं चीज होण्यास आता सुरूवात झाली असं वाटत आहे,' अशी भावना यशने व्यक्त केली. यशच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट करिअरवर लक्ष देण्यासाठी त्यांची नियमित नोकरी सोडली. त्याबद्दल बोलताना त्याचे वडील विजय म्हणाले की, ' दिल्लीसारख्या शहरात तुमच्या मुलाला क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतील. त्यानं इतरत्र न भटकता क्रिकेटवरच फोकस करावं यासाठी मला त्याला पूर्ण वेळ द्यायचा होता. त्यामुळे मी माझ्या करिअरचा विचार केला नाही आणि माझी नियमित नोकरी सोडली.' विजय पुढे म्हणाले की, 'यशला लहान वयातच खेळण्यासाठी सर्वात चांगले किट मिळावे याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे मी त्याला चांगल्या दर्जाच्या बॅट घेऊन दिल्या. यशकडे फक्त एकच बॅट नाही. मी सातत्याने त्याच्या बॅट अपग्रेड केल्या. यशसाठी आम्ही खर्चामध्ये कपात केली. माझे वडील निवृत्त सैनिक आहेत. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधूनच आमच्या घराचा खर्च होत असे.' अशी आठवण विजय यांनी सांगितली. बाबर आझमसाठी खेळाडू जीव देण्यासही तयार, पाकिस्तानच्या बॉलरचं मोठं वक्तव्य टीम इंडियात निवड झाल्यानंतर यश आता अंडर 19 टीमच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरूला जाणार आहे. यशनं यापूर्वी दिल्ली अंडर 16, दिल्ली अंडर 19 आणि टीम इंडिया अंडर 19 A या टीमची कॅप्टनसी केली आहे. आगामी आशिया कप स्पर्धेतही त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या