Home /News /sport /

पदावरुन दूर झाल्यानंतर टीम इंडियाच्या माजी कोचची प्रतिक्रिया, म्हणाले...

पदावरुन दूर झाल्यानंतर टीम इंडियाच्या माजी कोचची प्रतिक्रिया, म्हणाले...

भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. मावळते कोच WV रमन यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 21 मे: भारतीय महिला क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. महिला क्रिकेट टीमच्या कोचपदी रमेश पोवार (Ramesh Powar) यांची नियुक्ती झाली. त्यानंतर मावळते कोच WV रमन (WV Raman) यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना ई मेल  लिहून महिला क्रिकेटमधील गर्विष्ठ संस्कृती नष्ट करण्याची प्रतिक्रिया दिली होती. गांगुली यांनी या पत्रावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रमन यांनी पदावरुन दूर झाल्यानंतर  प्रतिक्रिया दिली आहे. रमन यांनी 'इंडिया टुडे' सोबत बोलताना याबाबतचे मत व्यक्त केले आहे. "मला कोचपदावरुन दूर केल्यानंतर बरीच चर्चा झाली. त्याची काही गरज नव्हती. मी खेळाडू होतो त्यावेळी काही लोकांचा गट टीमची निवड करत असे. काही वेळा तुमची निवड होते. तर काही वेळा तुम्हाला वगळण्यात येते. त्यामुळे माझ्याच बाबतीमध्ये इतकी चर्चा का होत आहे? हे समजत नाही. सुरुवातीला माझ्या जागेवर रमेश पोवार यांची हेड कोच म्हणून नियुक्ती झाली यावर लोकांनी चर्चा केली. याचा अर्थ त्यांना मी केलेली चांगली काम समजली आहेत. आता हा भूतकाळ झाला आहे. त्यामुळे या गोष्टी इथेच संपायला हव्या आहेत. " असे रमन यांनी स्पष्ट केले. WTC Final: इंग्लंड दौऱ्यापूर्वी रविंद्र जडेजा करतोय खास तयारी, VIDEO VIRAL 'ई मेल' मध्ये काय आहे? रमन यांनी सौरव गांगुलीला लिहिलेल्या ई मेलमध्ये महिला क्रिकेटमधील गविष्ठ संस्कृतीवर मत व्यक्त केले आहे. 'एखाद्या माजी खेळाडूचा श्वास या संस्कृतीमुळे कोंडला जात असेल तर त्यांनी (गांगुली) टीम इंडियाचा माजी कॅप्टन या नात्यानं या प्रकरणावर निर्णय घ्यायला हवा. कोचची ही मागणी जास्त आहे का?' असा सवाल रमन यांनी विचारला आहे. रमन यांनी या पत्रात कोच म्हणून अधिक सक्रीय नसण्याचा आरोप देखील फेटाळला आहे. 'मागच्या वर्षी टी 20 लीगमध्ये संयुक्त अरब अमिरातमधील गरम वातावारणात दुपारी एक ते रात्री नऊ पर्यंत आपण तीन टीमला प्रशिक्षण दिलं होतं, याची आठवण रमन यांनी करुन दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket

    पुढील बातम्या