• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC-XI मध्ये विराट नाही, तर 'या' तीन भारतीयांचा समावेश, वाचा संपूर्ण टीम

WTC-XI मध्ये विराट नाही, तर 'या' तीन भारतीयांचा समावेश, वाचा संपूर्ण टीम

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) हाच या टीमचा कॅप्टन आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) या टीममध्ये जागा मिळाली नसली तरी तीन भारतीयांची निवड करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून: आयसीसीने (ICC) आयोजित केलेली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धा नुकतीच पूर्ण झाली. 2019 साली ही स्पर्धा सुरु झाली होती. या स्पर्धेचा शेवट 23 जून रोजी झाला. फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. पहिल्या सिझनमध्ये एकूण 9 टीम सहभागी होत्या. ही स्पर्धा संपल्यानंतर 'क्रिकइन्फो' या क्रिकेट वेबसाईटनं फॅन्स आणि तज्ज्ञ मंडळींच्या मतदानाच्या आधारावर संपूर्ण स्पर्धेची एक टीम (WTC-XI) निवडली आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन  (Kane Williamson) हाच या टीमचा कॅप्टन आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन टीममधील काइल जेमिसन आणि टीम साऊदी या दोघांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) या टीममध्ये जागा मिळालेली नाही.  रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या तिघांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्याही स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिन्स या तिघांनी अंतिम 11 मध्ये जागा मिळवली आहे. श्रीलंका आणि इंग्लंडच्या एक-एक खेळाडूचा या टीममध्ये समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या चार टीममधील एकाही खेळाडूला या अंतिम टीममध्ये जागा मिळालेली नाही. ज्या भारतीय खेळाडूंचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यामध्ये रोहित शर्मानं 12 मॅचमध्ये 61 च्या सरासरीनं 1094 रन काढले आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. ऋषभ पंतनं 39 च्या सरासरीनं 707 रन काढले.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकण्यात त्याचा मोठा वाटा होता. तर आर. अश्विननं सर्वात जास्त 71 विकेट्स घेतल्या. पहिल्या सिझनमध्ये प्रत्येक टीमने 6 सीरिज खेळणे अपेक्षित होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे अनेक सीरिज स्थगित झाल्या. कशी तयार होते टीम इंडियाची आवडती डिश? पाहा VIDEO WTC -XI : रोहित शर्मा, दिमुख करुणारत्ने, मार्नस लबुशेन, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, काइल जेमिसन, आर. अश्विन, पॅट कमिन्स आणि टीम साऊदी
  Published by:News18 Desk
  First published: