Home /News /sport /

WTC Final : साऊथम्पटनमधून टीम इंडियासाठी काळजीची बातमी, विराटला सतावतेय 'ती' चिंता

WTC Final : साऊथम्पटनमधून टीम इंडियासाठी काळजीची बातमी, विराटला सतावतेय 'ती' चिंता

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New zealand) यांच्याात शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) सुरु होणार आहे. या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) एक चिंता सतावत आहे.

    साऊथम्पटन, 17 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New zealand) यांच्याात शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) सुरु होणार आहे. ही ऐतिहासिक फायनल खेळण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. न्यूझीलंडनं इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकून फायनलची तयारी केलीय. तर टीम इंडियानं साऊथम्पटनमध्ये जोरदार घाम गाळलाय. या फायनलपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) एक चिंता सतावत आहे. टीम इंडियाने या मैदानावर यापूर्वी 2014 आणि 2018 साली दोन टेस्ट खेळल्या आहेत. या दोन्ही टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. मात्र या मैदानावर चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) शतक झळकावले असून अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) देखील रेकॉर्ड चांगला आहे. या मैदानावर आजवर सहा टेस्ट झाल्या असून यापैकी तीन टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. दोन टेस्ट इंग्लंडने तर एक टेस्ट वेस्ट इंडिजने जिंकली आहे. टीम इंडियाने 2014 साली मालिकेतील दुसरी टेस्ट इथं खेळली होती. त्या टेस्टमध्ये इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना सात  आऊट 569 रन काढले. इंग्लंडकडून गॅरी बॅलन्स आणि इयान बेल यांनी शतक झळकावले. भारताने पहिल्या इनिंगमध्ये  रहाणे (54) आणि धोनी (50) यांच्या 330 रन काढले. इंग्लंडनं दुसरी इनिंग 4 आऊट 205 वर घोषित केली. 445 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची दुसरी इनिंग 178 रनवरच ऑल आऊट झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये रहाणे 52 रन काढून नाबाद राहिला. 60 रननं पराभव या टेस्टमध्ये बुमराह, इशांत, शमी आणि अश्विननं प्रभावी मारा केल्यानं इंग्लंडची पहिली इनिंग 246 रनवर संपुष्टात आली. टीम इंडियाला याचा फायदा उठवता आला नाही. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 273 रन काढले. चेतेश्वर पुजारानं एकाकी संघर्ष करत 132 रन काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडनं 271 पर्यंत मजल मारली. टीम इंडियासमोर विजयासाठी 245 रनचं लक्ष्य होतं. विराट कोहली (58) आणि अजिंक्य रहणे (51) यांनी संघर्ष केला, पण हे दोघं आऊट झाल्यानंतर भारताची दुसरी इनिंग  184 रनवरच संपुष्टात आली. नऊ विकेट्स घेणाऱ्या मोईन अलीला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मोईन अलीनं साऊथम्पटनमध्ये भारताविरुद्ध 2 टेस्टमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. तर रहाणेनं चार पैकी तीन इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. मोठी बातमी! अझहरुद्दीन HCA अध्यक्षपदावरुन निलंबित, सदस्यत्वही रद्द न्यूझीलंड अद्याप अपराजित न्यूझीलंडनं या ठिकाणी तीन वन-डे सामने खेळले आहेत. यापैकी एक सामना  रद्द झाला. तर 2013 आणि 2015 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या