• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final: विराटचा जडेजाबद्दलचा निर्णय चुकला, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

WTC Final: विराटचा जडेजाबद्दलचा निर्णय चुकला, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) बद्दलचा निर्णय चुकल्याचं मोठं वक्तव्य सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या पराभवामुळे आयसीसी (ICC) स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमला फायनलमध्ये कमाल करता आली नाही. न्यूझीलंडनं सर्वच बाबतीमध्ये सरस खेळ करत अजिंक्यपद पटकावले. भारताच्या या पराभवानंतरही अजूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सचिननं त्याच्या यूट्यूब चॅनलवरुन या पराभवाचं विश्लेषण केले आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) बद्दलचा निर्णय चुकल्याचं सचिननं सांगितलं. कोणता निर्णय चुकला? विराट कोहलीचं दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगचं नियोजन चुकलं. विशेषत: रविंद्र जडेजाला सहाव्या दिवशी कमी ओव्हर्स देणे टीम इंडियाला भारी पडले असे सचिनने सांगितले. “पाच बॉलर्ससह खेळताना सर्वांना समान ओव्हर्स मिळणे अशक्य आहे. कधीही तसं घडणार नाही. पिचची स्थिती, हवेतून मिळाणारी मदत याचा विचार करुन कोणत्या बॉलरला किती ओव्हर्स द्यायच्या याचा विचार करावा लागतो. पहिल्या इनिंगमध्ये जडेजापेक्षा अश्विनला जास्त ओव्हर देण्याचा निर्णय समजू शकतो कारण त्यावेळी न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सचे फुटमार्क मैदानात तयार झाले होते, पण जडेजा दुसऱ्या इनिंगमध्ये अनलकी ठरला,” असे सचिनने यावेळी सांगितले. “स्टंप-टू-स्टंप बॉलिंग करणे हे जडेजाचे बलस्थान आहे. त्यामुळे त्याच्या बॉलिंगवर बॅट्समन नेहमी LBW किंवा बोल्ड होण्याची शक्यता असते. पहिले तीन दिवस पिचमध्ये स्पिनर्सला कोणतीही मदत नव्हती. पण, पाचव्या आणि सहाव्या दिवशी ऊन पडले होते. शेवटच्या दिवशी बॉल असमान उसळत होता. पिच स्पिनर्सला मदत करत होते. त्यावेळी जडेजा कमी बॉलिंग मिळाल्यानं अनलकी ठरला.” असे सचिनने स्पष्ट केले. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, पहिल्या मॅचपूर्वी कॅप्टन धवनसाठी Good News साऊथम्पटन टेस्टमध्ये भारतीय टीम तीन फास्ट आणि दोन स्पिनर्ससह खेळली. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर यापूर्वी काही क्रिकेटपटूंनी टीका केली होती. सचिननं यापूर्वी हा निर्णय योग्य असल्याचं म्हंटलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: