• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : टीम इंडियाला 'या' गोष्टीचा मोठा फायदा, न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

WTC Final : टीम इंडियाला 'या' गोष्टीचा मोठा फायदा, न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं (WTC Final) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. दोन्ही टीममधील ही ऐतिहासिक फायनल 18 जूनपासून सुरु होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 मे : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं (WTC Final) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. दोन्ही टीममधील ही ऐतिहासिक फायनल 18 जूनपासून सुरु होणार आहे. टीम इंडियाला (Team India) आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा या फायनलमध्ये होईल, असा दावा न्यूझीालंडचा अनुभवी बॅट्समन रॉस टेलर (Ross Taylor) याने केला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असं मत टेलरनं व्यक्त केले आहे. बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने 30 मे रोजी समाप्त होणारी आयपीएल स्पर्धा  मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थगित करावी लागली होती. "आयपीएल स्पर्धा दुर्दैवाने स्थगित झाली. त्याचा टीम इंडियाला फायदा होईल. ही स्पर्धा नियोजित वेळेत संपली असती तर त्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळाला असता. आता त्यांच्याकडे बराच वेळ आहे. त्यांच्या बॉलर्सला याचा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी फायदा होईल." असे टेलरने सांगितले. न्यूझीलंडची टीम जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळणार आहे. मात्र टेलरच्या मनात सध्या फायनलचाच जास्त विचार आहे. "मी WTC फायनलबद्दल विचार करत नाही, असे म्हणालो तर ते खोटं असेल. ही मॅच एका तटस्थ ठिकाणी होणार आहे. आम्हाला दोन टेस्ट खेळल्याने फायदा होईल. मात्र टीम इंडिया बराच काळापासून नंबर 1 आहे," याची आठवण टेलरने करुन दिली. महिला टीमशी भेदभाव! 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूने BCCI ला सुनावले "आयपीएल ही कदाचित सर्वात मोठी लीग आहे. दुसऱ्या देशाकडे इतके सामर्थ्य नसेल तोपर्यंत ते आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाचा विचार करुन कार्यक्रम तयार करतील. कारण, क्रिकेटपटूंना या लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अजूही पहिलं प्राधान्य आहे, सर्व गोष्टी नियंत्रणात आहेत, तोपर्यंत ठीक आहे, " असे मत टेलरने व्यक्त केले.
  Published by:News18 Desk
  First published: