मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'ती चूक इंग्लंडमध्ये नको' रोहित शर्माला कोचनी दिला इशारा

'ती चूक इंग्लंडमध्ये नको' रोहित शर्माला कोचनी दिला इशारा

रोहित शर्माने (Rohit Sharma) एक ओपनिंग बॅट्समन म्हणून स्वत:ला टेस्टमध्ये सिद्ध केले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या सुरुवातीनंतरही रोहितला मोठा स्कोअर करता आला नव्हता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 मे: रोहित शर्माने (Rohit Sharma) एक ओपनिंग बॅट्समन म्हणून स्वत:ला टेस्टमध्ये सिद्ध केले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगल्या सुरुवातीनंतरही रोहितला मोठा स्कोअर करता आला नव्हता. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका (India vs England) होणार आहे. या दौऱ्यापूर्वी रोहितला त्याचे लहानपणीचे कोच दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी इशारा दिला आहे.

लाड यांनी 'स्पोर्ट्सकीडा' शी बोलताना सांगितले की, "या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध चांगली बॅटींग करत होता. त्याचा खेळ पाहून तो आऊट होणार नाही, असं वाटत होतं. मात्र त्यानं काही इनिंगमध्ये खराब शॉट खेळून विकेट फेकली. त्यानं इंग्लंडमध्ये ही चूक करु नये. त्यामुळे टीमचे नुकसान होईल." रोहितने ऑस्ट्रेलियात चार इनिंगमध्ये 26, 52, 44 आणि 7 रन काढले होते. टीम इंडियाने ती मालिका 2-1 ने जिंकली होती.

इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी

लाड यावेळी बोलताना म्हणाले की, "त्याला इंग्लंडमध्ये अधिक फोकस करावा लागेल. त्याने प्रत्येक बॉल त्याच्या मेरिटप्रमाणे खेळणे आवश्यक आहे. कारण, इंग्लंडमध्ये बॉल जास्त स्विंग होतो. त्यानं इंग्लंड विरुद्ध टर्निंग पिचवर खूप चांगली खेळ केला होता. त्या पिचवर अन्य बॅट्समनना बराच त्रास झाला. रोहित इंग्लंडमधील परिस्थितीनुसार खेळ करेल, असा मला विश्वास आहे."

बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर अंपायरने दिले Out, पाहा मजेशीर VIDEO

नेट सेशनचा फायदा

टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यानंतर तीन दिवस टीमला क्वारंटाईन राहावे लागेल. हा कालावधी संपल्यानंतर टीमची प्रॅक्टीस सुरु होईल. 'स्विंगचा सराव होण्यासाठी रोहितने नेट सेशनमध्ये किंवा अन्य खेळाडूंसोबत मॅच खेळून सराव करणे आवश्यक आहे. त्यानंतर तो तेथील वातावरणाशी समरस होईल,' असे लाड यांनी स्पष्ट केले.

First published:

Tags: Cricket, India vs england, Rohit sharma