Home /News /sport /

WTC Final : ऋषभ पंतच्या आऊट होण्यावर गावसकर नाराज, म्हणाले...

WTC Final : ऋषभ पंतच्या आऊट होण्यावर गावसकर नाराज, म्हणाले...

ऋषभ पंत (Rishabh Pant) आऊट झाल्यानंतर भारताची इनिंग लवकर संपुष्टात आली. त्याच्या या बेजाबदार फटक्यावर अनेक जण नाराज झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचाही समावेश आहे.

    मुंबई, 25 जून: ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021)  मोठ्या अपेक्षा होत्या. पंत पहिल्या इनिंगमध्ये लवकर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये तो संकटमोचकाच्या भूमिकेत खेळत होता. त्याने 41 रन काढले. त्यावेळी खराब शॉट मारत तो आऊट झाला. पंत आऊट झाल्यानंतर भारताची इनिंग लवकर संपुष्टात आली. त्याच्या या बेजाबदार फटक्यावर अनेक जण नाराज झाले आहेत.  यामध्ये टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचाही समावेश आहे. गावसकर यांनी सांगितले, "निर्भिडपणा आणि निष्काळजीपणा या दोन गोष्टीमध्ये एक छोटा फरक आहे. पंतनं अनेकदा त्याचे उल्लंघन केले आहे. त्याचा फटका टीम इंडियाला फायनलमध्ये बसला. पंतनं निर्भिड पद्धतीनं नाही तर निष्काळजीपणे बॅटींग केली. तो यापूर्वी देखील निष्काळजी शॉट खेळून 90 च्या घरात आऊट झाला आहे. त्यावेळी त्याच्याकडे शतक झळकावण्याची पूर्ण संधी होती. त्याने त्यावेळी थोडा संयम ठेवणे आवश्यक होते. त्याच्याकडे तंत्र आहे. तो प्रत्येक प्रकारचा शॉट खेळू शकतो. पण त्याची सर्वात मोठी समस्या ही शॉट सिलेक्शन आहे." गावसकर यांनी पुढे सांगितले की, "पंत जेव्हा पुस्तकी फटकेबाजी करतो ते पाहताना मजा येते. पण तो या पद्धतीनं शॉट मारुन आऊट झालेलं पाहणं त्रासदायक असतं. त्यानं यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निर्भिड पद्धतीनं बॅटींग केली आहे. त्याचा टीमला फायदा झाला. पण फायनल मॅचमध्ये त्याची ही पद्धत महाग पडली. तो दुसऱ्या इनिंगमध्ये सेट झाला होता. त्याने 41 रन काढले होते. तो थोडा संयमी खेळला असता तर भारताला मोठी आघाडी मिळाली असती. तेव्हा कदाचित मॅचचं चित्र वेगळं असतं. VIDEO: क्रिकेटच्या मैदानात Euro चा फिव्हर, धोनीच्या सहकाऱ्यानं केलं 'फुटबॉल रन आऊट' कोहलीनं केली पाठराखण गावसकर ऋषभ पंतवर नाराज असले तरी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पंतची पाठराखण केली आहे. फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने पंतचा बचाव केला होता. "पंतनं नैसर्गिक खेळ खेळावा अशी आमची अपेक्षा आहे. ती त्याची शक्ती आहे. त्याने अनेकदा एकट्याच्या जीवावर मॅचचं चित्रं बदललं आहे. काही वेळा तुमच्या मनासारखा निकाल लागत नाही. त्यावेळी चूक केली असं म्हंटलं जातं, पण खेळामध्ये असं घडत असतं." असं कोहलीनं स्पष्ट केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rishabh pant, Sunil gavaskar, Virat kohli

    पुढील बातम्या