मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : तिसऱ्या दिवशी क्रिकेटची रंगत की पावसाचा अडथळा? वाचा रविवारचे हवामान

WTC Final : तिसऱ्या दिवशी क्रिकेटची रंगत की पावसाचा अडथळा? वाचा रविवारचे हवामान

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) होत आहे. या ऐतिहासिक फायनलमध्ये पावसाचा अडथळा येत आहे.

  • Published by:  News18 Desk

साऊथम्पटन, 20 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) होत आहे. या ऐतिहासिक फायनलमध्ये पावसाचा अडथळा येत आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे टॉस देखील झाला नाही. तर दुसऱ्या दिवशी खराब  प्रकाशामुळे 64.4 ओव्हर खेळ झाला. आता या मॅचचं भवितव्य ठरण्यासाठी तिसरा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

तिसऱ्या दिवसाच्या खेळातही पावसाचा अडथळा येण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर सोमवारी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे हे दोन दिवस क्रिकेट फॅन्सची निराशा होणार आहे. पाच दिवसांमध्ये खेळ पूर्ण झाला नाही तर सहावा दिवस म्हणजेच 23 जून रिझर्व आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 आऊट 146 रन काढले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) या दोन्ही ओपनरनी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) चांगली सुरुवात करून दिली. पण या दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही. रोहित शर्मा 68 बॉलमध्ये 34 रन केले, तर शुभमन गिल 64 बॉलमध्ये 28 रन करून माघारी परतला. तर चेतेश्वर पुजारा 8 रन काढून आऊट झाला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, काइल जेमीसन आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कॅप्टननं दाखवला अश्विन-जडेजावर विश्वास, त्यांना खेळवण्याचं विराटनं सांगितलं कारण

पुजारा आऊट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे जोडीनं आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांच्या पार्टरनरशिपमध्ये पाऊस आणि खराब हवामामाचा वारंवार व्यत्यय येत होता. अखेल 64.4 ओव्हरनंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी विराट 44 तर अजिंक्य 29 वर खेळत होता.

First published:

Tags: Cricket, England, Weather, Weather update