मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final: टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून जोरदार प्रशंसा

WTC Final: टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची पदार्पणातच कमाल, जगभरातून जोरदार प्रशंसा

 भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील फायनल मॅचमध्ये (WTC Final) टीम इंडियाच्या (Team India) एका खेळाडूनं पदार्पण केलं. त्यानं पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील फायनल मॅचचा (WTC Final) पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी ही टेस्ट सुरु झाली. त्यावेळी टीम इंडियाच्या (Team India) एका खेळाडूनं पदार्पण केलं. त्यानं पदार्पणातच सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं हे पदार्पण क्रिकेटच्या मैदानात नाही तर कॉमेंटेटर म्हणून केलं आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) माजी कॅप्टन दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) कॉमेंटेटर म्हणून ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टेस्ट आहे. फायनल मॅचच्या पॅनलमध्ये माजी कॅप्टन सुनील गावसकर यांच्यासह त्याचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकनं कॉमेंट्रीच्या पहिल्याच दिवशी इंंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेन याला हजरजबाबी उत्तर दिले. टीम इंडिया बॅटींगला उतरल्यानंतर नासिर हुसेननं रोहित शर्माच्या तंत्राची प्रशंसा केली. "रोहित शर्मा चांगला पुलर आहे. तो स्पिनर्सच्या विरुद्ध त्याच्या पायाचा चांगला उपयोग करतो. तसेच त्याची वृत्ती सकारात्मक आहे." असं नासिर हुसेन म्हणाला. त्यावर कार्तिकनं अगदी तुझ्या उलट असं मजेदार उत्तर दिले. त्यावेळी सर्व कॉमेंटेटरना हसू आवरले नाही.

दिनेश कार्तिक या फायनलनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं आयोजित केलेल्या 'द हंड्रेड' लीगमध्येही कॉमेंटेटर म्हणून काम करणार आहे. त्याचबरोबर आगामी टी 20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छाही त्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

First published:

Tags: Cricket news, Social media