Home /News /sport /

WTC Final : विल्यमसनच्या एका ‘मास्टस्ट्रोक’ नं टीम इंडियाचा पराभव

WTC Final : विल्यमसनच्या एका ‘मास्टस्ट्रोक’ नं टीम इंडियाचा पराभव

साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं शेवटच्या दिवशी घेतलेल्या एका निर्णयामुळेच टीम इंडिया पराभूत झाली.

    मुंबई, 26 जून : टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत (WTC) दोन वर्ष चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात पराभव करत टीमनं इतिहास रचला. त्यानंतर मायदेशात इंग्लंडचा सहज पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत सर्वात जास्त टेस्ट जिंकणाऱ्या टीम इंडियाचं पारडं फायनलमध्ये जड होते. साऊथम्पटनमध्ये झालेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) यानं शेवटच्या दिवशी घेतलेल्या एका निर्णयामुळेच टीम इंडिया पराभूत झाली, असा खुलासा न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रँडन मॅकलम (Brendon Mccullum) यानं केला आहे. न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजेतेपदानंतर ‘क्रिकइन्फो’ या वेबसाईटसोबत बोलताना मॅकलमनं हा खुलासा केला आहे. फायनल टेस्टच्या सहाव्या दिवशी फास्ट बॉलर काईल जेमिसननं (Kyle Jamieson) बॉलिंगची सुरुवात करणे हा विल्यमसनचा मास्टरस्ट्रोक होता असे मॅकलमने सांगितले आहे. “माझ्या मते जेमिसननं बॉलिंगची सुरुवात केल्यानं टीम इंडिया अडचणीत आली. त्याच्या उंचीमुळे त्याने टाकलेले बॉल टीम इंडियाच्या बॅट्समन्सना नीट खेळता आले नाहीत. त्यामुळे त्यांची इनिंग अडखळली.’ जेमिसननं सकाळच्या सत्रात विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना झटपट आऊट करत भारतीय टीमला दोन मोठे धक्के दिले. ‘...तर वॉर्नर-मॅक्सवेल T20 वर्ल्ड कपमधून आऊट’, ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा गंभीर इशारा फायनल मॅचमध्ये टार्गेटचा पाठलाग करणे अवघड होते. पण रॉस टेलर आणि केन विल्यमसन या अनुभवी जोडीने ते काम पूर्ण केले. विजयानंतर तुम्ही टेलर आणि विल्यमसनचा चेहरा पाहिला असेल तर हे विजेतेपद त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं होतं, हे समजेल असं मॅकलमनं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand

    पुढील बातम्या