Home /News /sport /

WTC Final: विराटनं प्रॅक्टीसमध्ये दाखवलं ट्रेलर, फायनलमध्ये दिसणार पिक्चर! VIDEO

WTC Final: विराटनं प्रॅक्टीसमध्ये दाखवलं ट्रेलर, फायनलमध्ये दिसणार पिक्चर! VIDEO

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final 2021) आता आठवडाभरापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत.

    साऊथम्पटन, 13 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final 2021) आता आठवडाभरापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. न्यूझीलंडची टीम इंग्लंडसोबतच्या टेस्ट मालिकेतून स्वत:ला तयार करत आहे. त्याचवेळी टीम इंडियानं साऊथम्पटनमध्ये इन्ट्रा स्क्वॅड मॅच खेळून सराव केला. शनिवीरी या सामन्यांचा दुसरा दिवस होता. त्यावेळी टीम इंडियाची एक नवी रणनीती मैदानात दिसली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने या प्रॅक्टीस मॅचमध्ये बॉलिंग केली. विराटनं त्याच्या बॅटनं जगभरातील टीमना तडाखा दिला आहे. आता फायनल मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी विराट सर्व प्रकारचे उपाय करणार आहे. याचाच भाग म्हणून तो फायनलमध्ये गरज पडली तर बॉलिंग देखील करु शकतो. बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 13 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये विराटच्या हातामध्ये बॉल होता. तर त्याच्या समोर केएल राहुल (KL Rahul) बॅटींग करत होता. विराटने टाकलेला बॉल या व्हिडीओमध्ये पूर्ण दाखवण्यात आलेला नाही. विराटच्या बॉलवर राहुलनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला, बचाव केला की तो LBW झाला याचा अंदाज फॅन्सनी सांगावा असे कॅप्शन बीसीसीआयने दिले आहे. विराटने यापूर्वी वन-डे, टी20 क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॉलिंग केली आहे. वन-डे आणि टी20 मध्ये त्याच्या नावावर प्रत्येकी 4 विकेट्स असून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 3 विकेट्स आहेत. ‘या’ खास कारणासाठी युजवेंद्र चहल विश्वनाथ आनंद विरुद्ध खेळणार चेसचा सामना ऋषभ पंतचे शतक या सामन्यात एका टीमचं नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) तर दुसऱ्या टीमचं नेतृत्व चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) केलं. या सामन्यात ओपनर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 135 बॉलमध्ये 85 रन केले, तर ऋषभ पंतने (Rishabh Pant) 94 बॉलमध्ये नाबाद 121 रनची खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Kl rahul, Virat kohli

    पुढील बातम्या