मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final: कॅप्टननं दाखवला अश्विन-जडेजावर विश्वास, त्यांना खेळवण्याचं विराटनं सांगितलं कारण

WTC Final: कॅप्टननं दाखवला अश्विन-जडेजावर विश्वास, त्यांना खेळवण्याचं विराटनं सांगितलं कारण

टीम इंडियाने आर.अश्विन (R. Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोन स्पिनर्सचा समावेश केला आहे. साऊथम्पटनमधील हवामानात दोन स्पिनर्स खेळवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • Published by:  News18 Desk

साऊथम्पटन, 20 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021)  साऊथम्पटनमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्यासाठी त्याने टीम इंडियाला बॅटींगचे निमंत्रण दिले. विल्यमसनच्या या निर्णयानंतरही टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) निराश झालेला नाही.

विराटनं सांगितलं की, “ ही मोठी फायनल आहे. आम्ही पहिल्यांदा बॅटींग करत रन काढले तर आमच्यासाठी चांगलं आहे. आमच्यासाठी पहिल्यांदा बॅटींग करणे फायदेशीर ठरेल.” टीम इंडियानं फायनल टेस्टची Playing 11 गुरुवारीच जाहीर केली होती. या टीममध्ये आर.अश्विन (R. Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोन स्पिनर्सचा समावेश केला आहे. साऊथम्पटनमध्ये सतत पाऊस होत आहे. त्याचबरोबर मैदानात गवत देखील आहे. त्यामुळे दोन स्पिनर्स खेळवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विराटनं दोन स्पिनर्स का खेळवले याचं कारण सांगितले. “आमचे दोन्ही स्पिनर्स अनुभवी आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये बॉलिंग करण्याचे कौशल्य आहे. पिचवर थोडा जरी ओलावा असेल तरी त्याचा फायदा उठवण्याची त्यांची क्षमता आहे. दोघेही अचूक लाईन आणि लेंथवर बॉलिंग करतात. आम्ही त्यांचा चांगला वापर करणार आहोत.”

WTC Final: साऊथम्पटनच्या पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा, टीम इंडियाच्या कोचचं भाकीत

भारतीय टीमनं या मॅचमध्ये दोन स्पिनर्ससह तीन फास्ट बॉलर्सना संधी दिली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या तिघांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 3 आऊट 146 रन काढले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर खेळत आहेत.

First published:

Tags: Cricket news, R ashwin, Ravindra jadeja, Virat kohli