• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final: बॉलर साऊदी लवकरच मोडणार धोनीचा रेकॉर्ड, विराट-रोहित आहेत खूप मागे

WTC Final: बॉलर साऊदी लवकरच मोडणार धोनीचा रेकॉर्ड, विराट-रोहित आहेत खूप मागे

न्यूझीलंडचा प्रमुख बॉलर असलेल्या टीम साऊदीनं (Tim Southee) टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकत नवा रेकॉर्ड केला आहे. साऊदीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स आणि रिकी पॉन्टिंग या दिग्गजांना मागे टाकलंय.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून: टीम साऊदी (Tim Southee) हा न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) त्याने भारतीय बॅट्समनना चांगलंच त्रस्त केलं आहे. पाचव्या दिवसाच्या अखेरीस त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना आऊट करत टीम इंडियाला दोन धक्के दिले आहेत.  बॉलर असलेल्या साऊदीनं टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकत नवा रेकॉर्ड केला आहे. साऊदीनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स या दिग्गजांना मागे टाकलंय. टेस्ट क्रिकेटमध्ये सिक्स मारण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने या सर्वांना मागं टाकलं आहे. साऊदीनं भारताविरुद्ध मंगळवारी 2 सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) देखील मागे टाकलं आहे. आता तो लवकरच महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) मागे टाकू शकतो. साऊदीने मंगळवारी भारताविरुद्ध 46 बॉलमध्ये 30 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्याने दोन सिक्स लगावले. त्यामुळे त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील एकूण सिक्सची संख्या आता 75 झाली आहे. यापूर्वी साऊदी आणि  पॉन्टिंग 73-73 सिक्ससह बरोबरीत होते. साऊदीने 79 टेस्टमध्ये 75 सिक्स लगावले आहेत. त्याचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्स मारणाऱ्या टॉप 15 बॅट्समनमध्ये समावेश आहे. पॉण्टिंगनं 168 टेस्टमध्ये 73 सिक्स लगावले होते.  टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्कलमच्या नावावर आहे. मॅक्कलमने टेस्टमध्ये 107 सिक्स मारले आहेत. तर ऍडम गिलख्रिस्ट 100 सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 144 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना, फुटबॉल चॅम्पियन देशात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट भारताकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे, त्याने टेस्टमध्ये 91 सिक्स मारले होते. मॅकल्लम, गिलख्रिस्ट, क्रिस गेल आणि जॅक कॅलिस यांच्यानंतर सेहवाग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. धोनी 78 सिक्ससह 13 व्या क्रमांकावर आहे. साऊदीच्या निशाण्यावर आता धोनी असून त्याला मागे टाकण्यासाठी साऊदीला आणखी चार सिक्स लगावण्याची गरज आहे.
  Published by:News18 Desk
  First published: