WTC Final: विराट कोहलीला कोचचा इशारा, 13 वर्षांपासून असलेल्या धोक्याची केली आठवण

WTC Final: विराट कोहलीला कोचचा इशारा, 13 वर्षांपासून असलेल्या धोक्याची केली आठवण

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची (WTC Final 2021) तयारी करत आहे. ही फायनल जिंकण्यासाठी त्याला अनेक अडथळे पार करायचे आहेत. यामध्ये सर्वात मोठा अडथळा न्यूझीलंडच्या एका फास्ट बॉलरचा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जून: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची (WTC Final 2021) तयारी करत आहे. ही फायनल जिंकण्यासाठी त्याला अनेक अडथळे पार करायचे आहेत. यामध्ये सर्वात मोठा अडथळा न्यूझीलंडच्या एका फास्ट बॉलरचा आहे. विराटचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी याची जाणीव विराटला करुन दिली आहे.

न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला 10 वेळा आऊट केले आहे. विराटला साऊदीपासून मोठा धोका आहे, असे शर्मा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. साऊदी विरुद्ध आजवर काय चुका केल्या आहेत, हे विराटला चांगले माहिती असल्याचे शर्मा यावेळी म्हणाले.

"साऊदी विरुद्ध खेळताना काय चूक होते हे विराटला माहिती आहे. तरीही त्याने विराटाला 10 वेळा आऊट केले आहे. ही काळजीची गोष्ट आहे. विराट कोहलीला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल सोडून द्यावा लागेल. साऊदी सातत्याने एका लेन्थवर बॉलिंग करतो. त्यावेळी तो बॉल खेळायचा की सोडून द्यायचा याचा निर्णय बॅट्समनला घ्यायचा असतो. साऊदी बॉल चांगल्या पद्धतीने स्विंग करतो. त्याला पिचची मदत मिळाली तर खेळणे अशक्य होते.

टीम साऊदी आणि विराट कोहली अंडर-19 पासून एकमेकांच्या विरुद्ध खेळले आहे. साऊदी कोहलीविरुद्ध यशस्वी ठरला आहे. त्याच्या बॉलिंगवर विचारपूर्वक कव्हर ड्राईव्ह मारावा,'' असा सल्ला शर्मा यांनी दिला आहे.

टीम साऊदी फॉर्मात

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand) फास्ट बॉलर टीम साऊदीने  धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये साऊदीने 43 रन देऊन 6 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे साऊदीने भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मालाही (Ishant Sharma) मागे टाकलं आहे. एवढच नाही तर त्याने महान बॉलर सर रिचर्ड हॅडली (Richard Headley) यांचा विक्रमही मोडला आहे.

'अनेकांच्या मते तो टेस्टसाठी लायक नव्हता', पंतच्या निवडीवरून झाला होता वाद; वाचा Inside Story

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्याच साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल  होणार आहे. टीम साऊदी याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

Published by: News18 Desk
First published: June 9, 2021, 11:35 AM IST

ताज्या बातम्या