मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : न्यूझीलंडला हरवण्याची जय्यत तयारी, तिसऱ्याच दिवशी टीम इंडिया मैदानात

WTC Final : न्यूझीलंडला हरवण्याची जय्यत तयारी, तिसऱ्याच दिवशी टीम इंडिया मैदानात

इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाला (Team India) तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहवे लागणार होते. मात्र भारतीय खेळाडूंनी आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे.

    लंडन, 6 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2021) खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर टीम इंडियाला तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहवे लागणार होते. मात्र भारतीय खेळाडूंनी आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये असलेल्या स्टेडियममध्येच हॉटेल आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही याच हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसोलेशनच्या कालावधीमध्येही प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळाली आहे.  सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार हा सामना लॉर्ड्सवर होणार होता, पण कोरोनाचं संकट आणि खेळाडूंच्या क्वारंटाईनमुळे तसंच स्टेडियममध्येच हॉटेल असल्यामुळे ही मॅच साऊथम्पटनमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाच्या खेळाडूंना अद्यापही एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही. त्यामुळे सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या वेळी मैदानात व्यायाम केला. खेळाडूंना त्यांच्या रुममध्ये व्यायाम करण्याचे साहित्य देण्यात आले आहे. महिला आणि पुरुष टीमच्या खेळाडूंनी शनिवारी जिममध्ये देखील घाम गाळला. आता रविवारी टीम इंडियाचा आयसोलेशन कालावधी संपणार आहे. त्यानंतर खेळाडू लहान गटामध्ये जिममध्ये एकत्र व्यायाम करण्याची शक्यता आहे.  12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये होणार आहे, तर 23 जून हा रिझर्व डे असणार आहे. पाच दिवसांचा खेळ पूर्ण झाल्यानंतरही जर ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत, तर मॅच रेफ्री याचा निर्णय घेतील. जर मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. WTC Final : केन विल्यमसनची चिंता वाढली, टीम इंडिया उठवणार फायदा! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, Pujara, Team india

    पुढील बातम्या