• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : 'विराट, टॉस जिंकलास तर पहिल्यांदा....' दादानं दिला अनुभवाचा सल्ला

WTC Final : 'विराट, टॉस जिंकलास तर पहिल्यांदा....' दादानं दिला अनुभवाचा सल्ला

साऊथम्पटनचं हवामान लक्षात घेता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) टॉस जिंकणारा कॅप्टन काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जून : साऊथम्पटनचं हवामान लक्षात घेता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) टॉस जिंकणारा कॅप्टन काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं आहे. टीम इंडियानं या टेस्टमसाठी अंतिम 11 जणांची घोषणा एक दिवस आधीच केली आहे. या निर्णायक लढतीमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकला तर कोणता निर्णय घ्यावा याबबत बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) अनुभवाचा सल्ला दिला आहे. सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालीली टीम इंडिया ही स्पर्धा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टीमची खोली लक्षात घेता ही मॅच तितकी सोपी नाही, याची जाणीवही  करुन दिली आहे. फायनल मॅचचा टॉस विराटनं जिंकला तर पहिल्यांदा बॅटींग घ्यावी असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. टीम इंडियानं विदेशातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन हे पहिल्यांदा बॅटींग केल्यानंतरच केलं आहे, याची आठवण त्याने करुन दिली. गांगुलीनं 'आज तक' शी बोलताना सांगितले की, " आपण विदेशतील टीम इंडियाचा रेकॉर्ड पाहिला तर यावर्षी झालेला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अपवाद वगळता आपण नेहमी पहिल्यांदा बॅटींग करुन जिंकलेलो आहोत. आपण आजवर नेहमीच सुरुवातीच्या दबावाच्या परिस्थितीमध्ये बॅटींग केली आहे. मार्क टेलर किंवा स्टीव्ह वॉ सारख्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध आपण क्वचितच पहिल्यांदा फिल्डिंग केली आहे." न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये नव्या बॉलचा सामना करण्याची मोठी जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिलवर आहे. त्यांनी चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे. त्या दोघांनी किमान 20 ओव्हर्स बॅटींग केली पाहिजे. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना बॅटींग करणे सोपे जाईल." वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा गांगुलीनं यावेळी न्यूझीलंड टीमची प्रशंसीा केली. "ही गेल्या 30 ते 35 वर्षामधील न्यूझीलंडची सर्वोत्तम टीम आहे. त्यांनी इंग्लंडचा इंग्लंडमध्ये पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारतासाठी हे आव्हान सोपे नसेल. साऊदी आणि विल्यमसन शिवाय त्यांनी इंग्लंडला पराभूत केले हे त्यांची टीम मजबूत असल्याचं उदाहरण आहे. " असे गांगुलीने यावेळी स्पष्ट केले.
  Published by:News18 Desk
  First published: