• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : शेन वॉर्ननं केली न्यूझीलंडची पोलखोल, दुसऱ्याच दिवशी सांगितलं मॅचचं भविष्य

WTC Final : शेन वॉर्ननं केली न्यूझीलंडची पोलखोल, दुसऱ्याच दिवशी सांगितलं मॅचचं भविष्य

ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्ननं (Shane Warne) न्यूझीलंडनं एक स्पिनर न खेळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या रणनितीची पोल खोल वॉर्ननं ट्विटरवरुन केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला (WTC Final) सुरुवात झाली आहे. या फायनलमध्ये भारतीय टीम अश्विन आणि जडेजा या दोन स्पिनरना घेऊन मैदानात उतरली आहे. तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे तीन फास्ट बॉलर टीममध्ये आहेत. न्यूझीलंडने मात्र टीममध्ये एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही. न्यूझीलंडकडे काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डे ग्रॅण्डहोम या पाच फास्ट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्ननं (Shane Warne) न्यूझीलंडनं एक स्पिनर न खेळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या रणनितीची पोल खोल वॉर्ननं ट्विटरवरुन केली आहे. " न्यूझीलंडनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एकही स्पिनर खेळवलेला नाही. त्यामुळे मी खूप निराश आहे. हे पिच स्पिनर्सना मोठी मदत करणार आहे, असं दिसत आहे. तसं खरंच झालं आणि भारताने 275-300 पेक्षा जास्त रन काढले तर मॅच संपलीच म्हणून समजा. त्यानंतर फक्त हवामानच तुम्हाला वाचवू शकेल." असं भविष्य वॉर्ननं व्यक्त केलं आहे. भारताची सावध सुरुवात पहिला दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बॅड लाईटमुळे व्यत्यय आला आहे. खराब प्रकाशामुळे अंपायरनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाअखेरीस भारताने 3 आऊट 146 रन केले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर नाबाद आहे. अंपायरची चूक ठरली असती टीम इंडियावर भारी, थोडक्यात वाचला कोहली रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shumbhaman Gill) या दोन्ही ओपनरनी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) चांगली सुरुवात करून दिली. पण या दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही. रोहित शर्मा 68 बॉलमध्ये 34 रन केले, तर शुभमन गिल 64 बॉलमध्ये 28 रन करून माघारी परतला.
  Published by:News18 Desk
  First published: