मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : रोहित-गिल जोडीनं संपवला 10 वर्षांचा दुष्काळ, फायनल टेस्टमध्ये केली कमाल

WTC Final : रोहित-गिल जोडीनं संपवला 10 वर्षांचा दुष्काळ, फायनल टेस्टमध्ये केली कमाल

इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी पहिले 45 मिनिटे महत्त्वाची आहेत असा कानमंत्र महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दिला होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) जोडीनं गावसकरांचा सल्ला मानला.

साऊथम्पटन, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final) दुसरा दिवस टीम इंडियाच्या संयमी बॅटिंगनं गाजवला. या टेस्टमध्ये पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून लगेच पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.

साऊथम्पटनमध्ये सतत पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा फायदा उचलण्यासाठी  विल्यमसननं फिल्डिंग करण्याचे ठरवले. या वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी न्यूझीलंडनं पाच फास्ट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डे ग्रॅण्डहोम या पाच फास्ट बॉलर्ससह खेळत आहे.

रोहित-गिलची कमाल

इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी पहिले 45 मिनिटे महत्त्वाची आहेत असा कानमंत्र महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दिला होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) जोडीनं गावसकरांचा सल्ला मानला.

या जोडीनं टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देत ओपनिंग विकेटसाठी 62 रनची पार्टरनरशिप केली. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडच्या पिचवर एक रेकॉर्ड केला. इंग्लंडमध्ये भारतीय ओपनर्सनी तब्बल 10 वर्षांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. यापूर्वी गौतम गंभीर आणि अभिनव मुकुंद या जोडीनं 2011 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये 63 रनची पार्टरनरशिप केली होती. त्यानंतर एकदाही भारतीय ओपनर्सना टेस्ट क्रिकेटमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही.

45 मिनिट्स है तुम्हारे पास...! शाहरुखच्या 70 मिनिटांसारखा गावसकरांचा टीम इंडियाला मंत्र

टीम इंडियानं 2011 नंतर दोनवेळा इंग्लंडचा दौरा केला. 2014 आणि 2018 या दोन्ही दौऱ्यात टीमनं टेस्ट सीरिज गमावली. या दोन्ही दौऱ्यात खराब सुरुवात हे भारतीय बॅट्समनच्या अपयशाचं मुख्य कारण होते. आता तब्बल 29 इनिंगनंतर रोहित-गिल जोडीनं या दौऱ्यातील पहिल्याच टेस्टमध्ये आश्वासक सुरुवात केली आहे. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्टमध्ये याचा फायदा होणार आहे.

First published:

Tags: Cricket, England, New zealand, Rohit sharma