मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू ठरु शकतो न्यूझीलंडला भारी, वॉर्नरचं भाकीत

WTC Final : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू ठरु शकतो न्यूझीलंडला भारी, वॉर्नरचं भाकीत

संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आता 18 जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर (WTC Final 2021) लागलं आहे.  ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने देखील या फायनलबद्दल भाकीत व्यक्त केले आहे

पुढे वाचा ...

मुंबई, 14 जून : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष आता 18 जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर (WTC Final 2021) लागलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या टेस्ट मॅचबद्दल अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांचा अंदाज सांगितला आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने देखील या फायनलबद्दल भाकीत व्यक्त केले आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टीम इंडियानं कोणत्या  खेळाडूंसह उतरावं हे सांगितलं आहे.

टीम इंडियानं रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोघांनाही खेळवावं असा सल्ला वॉर्नरनं दिला आहे. जडेजाचं महत्त्व सांगताना वॉर्नर म्हणाला की,"डावखुरा स्पिनर असलेला जडेजा एका विशिष्ट उंचीनं सातत्यानं हॉलिंग करु शकतो. जडेजानं डावखुऱ्या बॅट्समनच्या विरुद्ध चांगली बॉलिंग केलेली आहे. ते दोन्ही स्पिनर न्यूझीलंडला त्रस्त करतील असं मला वाटतं."

इंग्लंडमध्ये जडेजाचा जलवा

टीम इंडिया देखील सध्या या फायनलची जोरदार तयारी करत आहे. या फायनलसाठी भारतीय टीम साऊथम्पटनच्या एजियस बाऊलमध्ये इन्ट्रा स्क्वॅड मॅच खेळत आहे.प्रॅक्टीस मॅचच्या तिसऱ्या दिवशी जडेजानं जोरदार बॅटींग केली. गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मात असलेल्या जडेजानं प्रॅक्टीस मॅचचा तिसरा दिवस गाजवला. जडेजानं 76 बॉलमध्ये नाबाद 54 रनची खेळी केली.

'ग्रेग चॅपल चूक नव्हते, पण सीनिअर खेळाडू...' सुरेश रैनानं उलगडलं 'ते' रहस्य

जडेजा की अश्विन?

टीम इंडियाचे संतुलन राखण्यासाठी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या दोघांचा समावेश नक्की मानला जात आहे. बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही हे अनुभवी खेळाडू उपयुक्त आहेत. मात्र साऊथम्पटनचं हवामान आणि पिच फास्ट बॉलिंगला मदत करणारी आहे.

न्यूझीलंडची टीमही याच कारणामुळे फायनलमध्ये 4 फास्ट बॉलर्सना घेऊन खेळणार हे नक्की आहे. टीम इंडियाकडेही इशांत, शमी, बुमराह आणि सिराज हे चार अव्वल फास्ट बॉलर्स आहेत. त्यामुळे या चौघांना खेळवण्यासाठी जडेजा आणि अश्विन यापैकी कुणाची निवड करावी हा विराटसमोरचा मोठा प्रश्न आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, David warner, Ravindra jadeja