मुंबई, 14 जून: न्यूझीलंडनं इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2021) फायनलसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे. टीम इंडिया देखील सध्या या फायनलची जोरदार तयारी करत आहे. या फायनलसाठी भारतीय टीम साऊथम्पटनच्या एजियस बाऊलमध्ये इन्ट्रा स्क्वॅड मॅच खेळत आहे. या सराव सामन्यात आत्तापर्यंत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिल (Shbuman Gill) यांनी जोरदार बॅटींग केल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) त्याचा खेळ दाखवला आहे.
प्रॅक्टीस मॅचच्या तिसऱ्या दिवशी जडेजानं जोरदार बॅटींग केली. बीसीसीआयनं तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये जडेजा इशांत शर्माच्या बॉलवर चांगला फटका मारताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मात असलेल्या जडेजानं प्रॅक्टीस मॅचचा तिसरा दिवस गाजवला. जडेजानं 76 बॉलमध्ये नाबाद 54 रनची खेळी केली. तर बॉलिंगमध्ये मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) दिवस होता. त्याने 22 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या.
.@imjadeja gets to his half-century (54* off 76) as play on Day 3 of the intra-squad match simulation comes to end.@mdsirajofficial is amongst wickets with figures of 2/22.#TeamIndia pic.twitter.com/3tIBTGsD3L
— BCCI (@BCCI) June 13, 2021
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडच्या माजी कॅप्टननं दिला टीम इंडियाला दोष
यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये ऋषभ पंतनं शतक झळकावलं होतं. पंतनं 94 बॉलमध्ये नाबाद 121 रनची खेळी केली. तर ओपनर शुभमन गिलनं 135 बॉलमध्ये 85 रन केले. भारतीय टीम 3 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली, यानंतर त्यांना 3 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर खेळाडूंच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली, यानंतर आता सराव सामना सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतरही भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, Ravindra jadeja, Team india