लंडन, 9 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जून पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं (WTC Final 2021) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या फायनलसाठी टीम इंडिया प्रमाणे न्यूझीलंड देखील जय्यत तयारी करत आहे. न्यूझीलंडच्या याच योजनेचा भाग म्हणून इंग्लंडमध्ये गुरूवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.
फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टीम साऊदी, नील वेग्नर आणि काईल जेमीसन यांच्यापैकी एकाला विश्रांती देण्यात येणार आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. फायनल मॅचसाठी आमचे प्रमुख बॉलर ताजे राहावे आणि त्यांनी भारताविरुद्ध पहिल्या बॉलपासून चांगले प्रदर्शन करावे यासाठी आम्हाला खबरदारी घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.
"आम्ही 20 खेळाडूंसह इथे आलो आहोत. आमच्या टीममधील अनेकांना टेस्ट क्रिकेटचा अनुभव आहे. मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, डग ब्रेसवेल, एजाज पटेल यासारखे खेळाडू यापूर्वी टेस्ट खेळले आहेत.'' याची आठवण त्यांनी करुन दिली.
WTC Final: विराट कोहलीला कोचचा इशारा, 13 वर्षांपासून असलेल्या धोक्याची केली आठवण
न्यूझीलंडला मोठा धक्का
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) आणि डावखुरा स्पिनर मिचेल सॅन्टनर (Mitchell Santner) यांना दुखापत झाली आहे. विलियमसनच्या कोपराला तर मिचेल सॅन्टनरच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. हे दोघेही गुरुवारपासून सुरु होणारी दुसरी टेस्ट खेळण्याची शक्यता कमी आहे. दोन टेस्टच्या या सीरिजची पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, Team india