WTC Final: टीम इंडियाला धोक्याचा इशारा, विजेतेपदासाठी 'हा' अडथळा करावा लागणार पार

WTC Final: टीम इंडियाला धोक्याचा इशारा, विजेतेपदासाठी 'हा' अडथळा करावा लागणार पार

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलची (WTC Final 2021) जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमला एक मोठा अडथळा पार करावा लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final) न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सनी टीम इंडियाचा धोक्याचा इशारा दिला आहे. 18 जूनपासून फायनल मॅच सुरु होणार आहे. सध्या न्यूझीलंडची टीम (New Zealand) इंग्लंड विरुद्ध दुसरी टेस्ट खेळत आहे. फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सनी ड्यूक बॉलने चांगला अभ्यास केला आहे. पहिल्या टेस्टमध्ये काइल जेमीसन आणि टीम साऊदी यांनी घातक बॉलिंग केली होती. तर दुसऱ्या टेस्टमध्ये मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्ट यांनी इंग्लंडच्या बॅट्समन्सना त्रस्त केले.आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर असलेला नील वेग्नर देखील आता रंगात येऊ लागला आहे.

इंग्लंडची टॉप ऑर्डर फेल

लॉर्ड्सवर झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्ससमोर इंग्लंडचे बॅट्समन अडखळले. इंग्लंडची पहिली इनिंग 275 रनवर आटोपली. त्यामध्ये एकट्या रॉरी बर्न्स याने 132 रन काढले होते. टीम साऊदीने (Tim Southee) सहा तर काइल जेमीसनने तीन विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडची अवस्था 2 आऊट 56 झाली होती. दुसऱ्या टेस्टमध्ये साऊदी आणि जेमीसननंला आराम देऊन त्यांच्या जागी बोल्ट आणि हेन्रीचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या टेस्टमध्येही न्यूझीलंडची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 7 आऊट 258 रन काढले. डॉम सिब्ले आणि रॉरी बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी 72 रनची पार्टरनरशिप केली. त्यानंतर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी कमबॅक केले. इंग्लड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्या मालिकेतील तीन इनिंगमध्ये न्यूझीलंडचे बॉलर्स फॉर्ममध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

पाच फास्ट बॉलर्सचा करणार समावेश

न्यूझीलंडच्या टीममध्ये साऊदी, बोल्ट,जेमीसन आणि वॅग्नर या चार फास्ट बॉलर्सचा समावेश नक्की आहे. साऊदीचा लेग कटर तर बोल्टचा इनस्विंग प्रभावी आहे. जेमिसननं टेस्ट कारकीर्दीची सुरुवात प्रभावी केली आहे. तो बॅटने देखील उपयुक्त आहे. त्याचबरोबर नील वेग्नर देखील वेग आणि अचूक बाऊन्सरसाठी ओळखला जातो.

IND vs SL : टीम इंडियामध्ये निवड झालेला सिमरजीत सिंह कोण आहे?

न्यूझीलंडचा स्पिनर मिचेल सँटनर जखमी असल्याने दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. त्याच्या जागी एजाज पटेलला संधी देण्यात आली आहे. पहिल्या टेस्टमध्ये कॉलीन डी ग्रँडहोम खेळला तर दुसऱ्या टेस्टमध्ये डेरिल मिचेलला संधी मिळाली. साऊथम्पटनच्या पिचवर गवत चांगले असे अशी आशा आहे. त्यामुळे फायनलमध्ये या सर्वांपैकी एकाला संधी मिळेल.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 10:25 AM IST

ताज्या बातम्या