मुंबई, 14 जून: न्यूझीलंडनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC Final 2021) झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडचा 1-0 नं पराभव केला. या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. पण, फायनलपूर्वीची डोकेदुखी कायम आहे. फायनल मॅचमधील अंतिम 11 (Playing XI) निवडणे हा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) समोर मोठा प्रश्न आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल 18 जून पासून साऊथम्पटनमध्ये होणार आहे.
चौथा फास्ट बॉलर कोण?
न्यूझीलंड फायनलमध्ये चार फास्ट बॉलर्लसह उतरणार आहे. यामध्ये ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि नील वेग्नर यांचा समावेश नक्की आहे. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडची टीम टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 बनली आहे. चौथ्या फास्ट बॉलर्ससाठी काइल जेमीसन आणि मॅट हेन्री यांच्यात स्पर्धा आहे. जेमिसननं इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर हेन्रीनं दुसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्स घेत 'मॅन ऑफ द मॅच' हा पुरस्कार पटकावला होता.
हेन्री टीम इंडियासाठी डोकेदुखी
मॅट हेन्रीनं 2019 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला त्रास दिला होता. त्याच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडनं सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केले. दुसरिकडं 6 फुट 8 इंच उंचीच्या काइल जेमिसननं टीम इंडियाच्या विरुद्ध 2 टेस्टमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकण्यात जेमिसनचे योगदान होते. त्याचबरोबर जेमीसन चांगली बॅटींग देखील करु शकतो. त्यामुळे हेन्रीची खेळण्याची शक्यता कमी आहे.
पटेल की सँटनर?
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑफ स्पिनर एजाज पटेलनं 4 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या टेस्टमध्ये सँटनरला एकही विकेट मिळाली नाही. सँटनरला दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमध्ये खेळता आले नाही. एजाज पटेलनं 9 टेस्टमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. तर सँटनरनं 24 टेस्टमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ऑल राऊंडर कॉलीन डी ग्रँडहोम हा देखील या स्पर्धेत आहे.
न्यूझीलंडची संभाव्य टीम : टॉम लॅथम, डेवॉन कॉनवे, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीजे वॅटलिंग, मिचेल सँटनर, टीम साऊदी, काईल जेमिसन टीम साऊदी, नील वेग्नार आणि ट्रेंट बोल्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand