Home /News /sport /

WTC Final मधील पराभवानंतर टीम इंडियाची सुट्टी सुरू, पाहा Photos

WTC Final मधील पराभवानंतर टीम इंडियाची सुट्टी सुरू, पाहा Photos

टीम इंडिया फायनलनंतर साऊथम्पटनहून लंडनला परतली आहे. आता सर्व क्रिकेटपटू त्यांच्या सुट्टीच्या ठिकाणी रवाना होत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अग्रवाल (Myank Agarwal) यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

    मुंबई, 26 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या पराभवाला विसरुन आगामी इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज होण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पाच टेस्ट मॅचची ही सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सीरिजला आणखी वेळ असल्यानं सर्व खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. बायो-बबलच्या बंधनात पुन्हा एकदा परतण्यापूर्वी ताजं होण्यासाठी या ब्रेकचा खेळाडूंना उपयोग होणार आहे. टीम इंडिया फायनलनंतर साऊथम्पटनहून लंडनला परतली आहे. आता सर्व क्रिकेटपटू त्यांच्या सुट्टीच्या ठिकाणी रवाना होत आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अग्रवाल (Myank Agarwal) यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत धमाल करत आहेत. रोहित शर्मानं इंस्टाग्रामवर पत्नी रितिका आणि मुलीचं स्टेट्स लावलं आहे. त्यामध्ये त्या दोघी लॉस्ट किंगडम पार्कमध्ये मजा करत आहेत. तर, मयांक अग्रवालनं त्याच्या पत्नीसोबत ब्राईटन पॅलेस बाहेरचा फोटो शेअर केला आहे. तो स्थानिक बाजारामधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. धोनीनं झाडं लावण्याचा संदेश दिल्यानंतर नेटीझन्स नाराज, म्हणाले... टीम इंडियाचे काही खेळाडू टेनिस फॅन आहेत. विम्बल्डन स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी मिळाली तर काही जण टेनिस पाहण्यासाठी जातील. तर काही जण वेम्बलेमध्ये होणाऱ्या युरो कप मॅचचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व खेळाडू 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र येतील. त्यानंतर ते नॉटिंगहमला रवाना होतील. तिथे पहिली टेस्ट मॅच होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Instagram post, Rohit sharma

    पुढील बातम्या