लंडन, 4 मे : भारतीय क्रिकेट टीम (Team India) न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया 18 जूनपासून साऊथम्पटनमध्ये ही फायनल मॅच खेळणार आहे. त्यानंतर चार ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची मालिका सुरु होणार आहे. टीम इंडिया साऊथम्पटनमध्ये दाखल होताच सर्व खेळाडूंना तीन दिवस कडक क्वारंटाईनमध्ये राहवं लागणार आहे. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) याने ही माहिती दिली आहे.
या तीन दिवसांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना एकमेकांशी भेटण्याचीही परवानगी नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट टीमकडं फायनल मॅचची तयारी करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक आहे. दुसरिकडं न्यूझीलंडची टीम इंग्लंड विरुद्ध सध्या दोन टेस्टची मालिका खेळत आहे. टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईमध्येही 14 दिवस क्वारंटाईन होते.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) टीम इंडियाच्या विमान प्रवासाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षरने सांगितले की, "मी छान झोप घेतली. आता आम्हाला क्वारंटाईन राहावं लागणार आहे. आम्हाला तीन दिवस एकमेकांशी भेटता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.''
✈️
Excitement is building up as #TeamIndia arrive in England pic.twitter.com/FIOA2hoNuJ — BCCI (@BCCI) June 4, 2021
भारताची पुरुष आणि महिला टीम एकाच विमानातून इंग्लंडला रवाना झाली. लंडनला गेल्यानंतर दोन तास बसने प्रवास केल्यानंतर टीम साऊथम्पटनला दाखल झाली. महिला टीम इंग्लंड विरुद्ध एक टेस्ट, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. महिला टीमचा इंग्लंड दौरा 15 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
IPL 2021 : स्पर्धा पूर्ण करण्यासाठी BCCI ची कसरत, वेळापत्रकात करणार मोठा बदल
कोरोना व्हारयसमुळे बदललेल्या परिस्थितीचा विचार करुन टीम इंडिया 20 सदस्यांसह इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या फायनलपूर्वी टीम इंडियाला सरावासाठी फक्त चार सेशन मिळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axar patel, India vs england, New zealand, Team india