• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC फायनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्काची मजेशीर पोस्ट, म्हणाली....

WTC फायनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्काची मजेशीर पोस्ट, म्हणाली....

विराटसोबत (Virat Kohli) त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका देखील आहे. अनुष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन विराटबद्दल एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे.

 • Share this:
  लंडन, 6 जून: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी (WTC Final 2021) साऊथम्पटनमध्ये आहे. विराटसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका देखील आहे. अनुष्कानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन विराटबद्दल एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे. अनुष्कानं इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. साऊथमप्टनमधील हा फोटो असून त्याला तिने एक मजेदार कॅप्शन दिले आहे.  'काम घरी आणू नये, ही गोष्ट सध्या विराटसाठी लागू नाही' असं अनुष्कानं म्हंटलं आहे. टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंडला दाखल झाली आहे. सर्व खेळाडूंना तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असून त्यानंतर छोट्या गटामध्ये सराव करता येईल. अर्थात न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या उद्देशानं इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या दिवशीच सराव सुरु केला आहे.
  टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली.इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये असलेल्या स्टेडियममध्येच हॉटेल आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही याच हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसोलेशनच्या कालावधीमध्येही प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळाली आहे. 'बंदी संपली, आता खेळू द्या,' फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूची BCCI कडे मागणी 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. तर 23 जून हा रिझर्व डे आहे.
  Published by:News18 Desk
  First published: