WTC Final: 100 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या बॅट्समनला रोखण्यासाठी विराट वापरणार खास अस्त्र

न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे (Devon Conway) हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) खास अस्त्र वापरणार आहे.

न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे (Devon Conway) हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) खास अस्त्र वापरणार आहे.

  • Share this:
    लंडन, 12 जून : न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे (Devon Conway) हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. याच महिन्यात लॉर्डसवर टेस्ट पदार्पण करणारा कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने पदार्पणातील इनिंगमध्येच द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्येही 80 रनची खेळी केली. कॉनवेनं आत्तापर्यंत 101 च्या सरासरीने 303 रन काढले आहेत. न्यूझीलंडची फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट खेळण्याची योजना यशस्वी झाली आहे. या मालिकेत सर्व बॉलर्सना सरावाची संधी मिळाली. त्याचबरोबर कॉनवेची योग्यता देखील सिद्ध झाली. त्यामुळे न्यूझीलंडची ओपनिंगची समस्या संपली आहे. कॉनवेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 14 मॅचमध्ये 59. 12 च्या ससरासरीने 473 रन काढले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण केल्यानंतर त्याला यावर्षी मार्च महिन्यात वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. कॉनवेनं तीन वन-डे मध्ये 75 च्या सरासरीनं 225 रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. भारताकडे खास अस्त्र कॉनवेनं इंग्लंड विरुद्ध तीन टेस्टमध्ये 554 बॉलचा सामना केला आहे. त्याने या मालिकेत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड आणि ओली स्टोन या फास्ट बॉलर्सचा त्यांच्याच मैदानात सामना केला आहे. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे दिग्गज फास्ट बॉलर्स आहेत. 'राहुल द्रविडने तयार केली मॅच विनर्सची फौज, पूर्णपणे बदलली टीम इंडिया' या तिघांपेक्षाही कॉनवेला रोखण्यासाठी आर. अश्विन (R. Ashwin) हा अनुभवी ऑफ स्पिनर अधिक उपयुक्त ठरणार आहे. अश्विननं आजवर 200 पेक्षा जास्त डावखुऱ्या बॅट्समन्सना आऊट केले आहे. त्यामुळे कॉनवेला आऊट करण्यासाठी विराटची मुख्य भिस्त ही अश्विनवर असेल. अश्विन सध्या टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आहे. मागील दोन टेस्ट सीरिजमध्ये त्याने प्रभावी बॉलिंग केली आहे. त्यामुळे साऊथम्पटनमध्ये कॉनवे विरुद्ध अश्विन ही लढत बघायला मिळणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published: