मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final: अंपायरची चूक ठरली असती टीम इंडियावर भारी, थोडक्यात वाचला कोहली

WTC Final: अंपायरची चूक ठरली असती टीम इंडियावर भारी, थोडक्यात वाचला कोहली

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक टेस्टला (WTC Final) सुरुवात झाली आहे. साऊथम्पटन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायरच्या एका चूक टीम इंडियावर भारी पडली असती.

  • Published by:  News18 Desk

साऊथम्पटन, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक टेस्टला (WTC Final) सुरुवात झाली आहे. या टेस्टनंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासातील पहिला विजेता निश्चित होणार आहे. त्यामुळे ही टेस्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे. बॅट्समनची एखादी खेळी किंवा बॉलर्सचा एक घातक स्पेल मॅचचा निर्णय बदलू शकतो. त्याचबरोबर या टेस्टमध्ये होणारी अंपायरिंग देखील अतिशय महत्त्वाची आहे. अंपायरची एक चूक देखील एखाद्या टीमवर भारी पडू शकते. साऊथम्पटन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायरच्या एका चूक टीम इंडियावर भारी पडली असती.

काय घडला प्रसंग?

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) बाबत अंपायरनं घेतलेला एक अजब निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दरम्यान ट्रेंट बोल्टचा एक बॉल विराटच्या लेग स्टंपच्या जवळून विकेट किपरकडे गेला. त्यावर बोल्टनं कॅच आऊटचे अपील केले. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने देखील बोल्टच्या या अपिलमध्ये जास्त रस दाखवला नाही. विल्यमसननं यासाठी DRS ची मागणी केली नव्हती. तरीही मैदानातील अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी चर्चा करुन रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

इलिंगवर्थ यांच्या या अजब निर्णयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virendera Sehwag) ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

सेहवाग प्रमाणेच सोशल मीडियावर ही खराब अंपायरिंग चर्चेचा विषय होती.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी वडिलांचे निधन, जिद्दी क्रिकेटपटूनं पहिल्याच टेस्टमध्ये वाचवली मॅच

खराब अंपायरिंग आणि खराब हवामान याचा कोणताही परिणाम विराट कोहलीच्या खेळावर झाला नाही. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस विराट कोहली 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर खेळत आहेत.  तर टीम इंडियानं 3 आऊट 146 पर्यंत मजल मारली आहे.

First published:

Tags: Cricket news, Social media, Team india, Virat kohli