साऊथम्पटन, 20 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल मॅचला (WTC Final 2021) हवामानाचा फटका बसला आहे. पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी एकूण 64.4 ओव्हरच खेळ होऊ शकला. टीम इंडियाची सर्वात मोठी समर्थक आर्मी असलेली भारत आर्मी (Bharat Army) सध्या साऊथम्पटनमध्ये आहे. ही आर्मी सध्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहे. त्यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक खास गाणं तयार केलं आहे.
विराटनं दुसऱ्या दिवशी परिस्थितीनुसार बॅटींग केली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस तो 44 रन काढून नाबाद आहे. शनिवारी भारत आर्मीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये या आर्मीचे सदस्य विराटचा उत्साह वाढवत आहेत. भारत आर्मीनं ढोल वाजवत हे रॅप साँग तयार केलं आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आयसीसीनं (ICC) देखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे गाणं शेअर केलं आहे.
View this post on Instagram
WTC Final : शेन वॉर्ननं केली न्यूझीलंडची पोलखोल, दुसऱ्याच दिवशी सांगितलं मॅचचं भविष्य
पहिला दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बॅड लाईटमुळे व्यत्यय आला आहे. खराब प्रकाशामुळे अंपायरनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाअखेरीस भारताने 3 आऊच 146 रन केले आहेत. विराट कोहली 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर नाबाद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virat kohli