मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final: फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर विजेता कोण? ICC नं घेतला निर्णय

WTC Final: फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर विजेता कोण? ICC नं घेतला निर्णय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल (WTC Final 2021) मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या टीमला विजेतेपद मिळणार?  हा प्रश्न क्रिकेट फॅन्स गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल (WTC Final 2021) मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या टीमला विजेतेपद मिळणार? हा प्रश्न क्रिकेट फॅन्स गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल (WTC Final 2021) मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या टीमला विजेतेपद मिळणार? हा प्रश्न क्रिकेट फॅन्स गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.

दुबई, 28 मे: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल (WTC Final 2021) होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही टीम सध्या जय्यत तयारी करत आहेत. फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर कोणत्या टीमला विजेतेपद मिळणार?  हा प्रश्न क्रिकेट फॅन्स गेल्या काही दिवसांपासून विचारत होते.

आयसीसीने अखेर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. फायनल मॅच ड्रॉ किंवा टाय झाल्यास दोन्ही टीम या स्पर्धेचे संयुक्त विजेते असतील असे आयसीसीने शुक्रवारी जाहीर केले आहे. या फायनलसाठी 23 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. पाच दिवसांच्या खेळात पावसामुळे किंवा कोणत्या अन्य कारणांमुळे अडथळा आला तर उर्वरित ओव्हर्स 23 जून रोजी खेळवण्यात येतील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.मात्र पाच दिवस पूर्ण सामना झाल्यानंतरही निकाल न लागल्यास सहाव्या दिवशी खेळ होणार नाही.

नव्या नियमांची अंमलबजावणी

हा सामना ग्रेड 1 ड्यूक बॉलने खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या गेलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमधील बदलांची WTC मध्ये देखील अंमलबजावणी होणार आहे.

IPL स्पर्धेच्या दरम्यान 8-9 दिवस झोपला नाही अश्विन, क्रिकेटपटूनं सांगितलं 'ते' कारण

शॉर्ट रन (Short Run) : मैदानावरील अंपायरनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू थर्ड अंपायर करणार आहे.

प्लेयर रिव्ह्यू  (Player Review) : LBW चा निकाल दिल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन किंवा आऊट झालेला बॅट्समन बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता का? हे मैदानातील अंपायरला विचारणा करुन प्लेयर रिव्ह्यू घेऊ शकतो.

डीआरएस (DRS Review) : LBW च्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी स्टम्पवर आदळणाऱ्या बॉलची उंची आणि लांबी यावरुन अम्पायर्स कॉलचा निर्णय घेण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Icc