Home /News /sport /

'तो' असेपर्यंत मला....' महेंद्रसिंह धोनीबद्दल साहाचं मोठं वक्तव्य

'तो' असेपर्यंत मला....' महेंद्रसिंह धोनीबद्दल साहाचं मोठं वक्तव्य

वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) दीर्घकाळ भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे,तरीही त्याला टीम इंडियामध्ये फार संधी मिळाली नाही. साहाने विषयावर मत व्यक्त केले आहे.

    मुंबई, 22 मे : टीम इंडियाचा विकेटकिपर - बॅट्समन वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने कोरोना विरुद्धची लढाई नुकतीच जिंकली आहे. त्याला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती.  15 दिवसांपेक्षा जास्त काळ क्वारंटाईन राहिल्यानंतर साहा आता कोलकाताला घरी परतला आहे. साहा इंग्लंडला जाणाऱ्या टीम इंडियाचा सदस्य असून तो 24 मे रोजी टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये मुंबईमध्ये दाखल होईल. वृद्धीमान साहा दीर्घकाळ भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे,तरीही त्याला टीम इंडियामध्ये फार संधी मिळाली नाही. 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना त्याने या विषयावर मत व्यक्त केले आहे. "माझ्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंह धोनी टीममध्ये (MS Dhoni) होता. तो असेपर्यंत मला टीममध्ये संधी मिळाली नाही.' असे साहाने सांगितले आहे. साहा 2014 ते 2018 या कालावधीमध्ये नियमित खेळला. त्यानंतर तो जखमी झाल्यानंतर दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल आणि ऋषभ पंत यांना टीम इंडियामध्ये संधी मिळाली. पंतनं त्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा साहाला पुन्हा एकदा संधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2014 पर्यंत खेळल्या फक्त 2 टेस्ट साहाने 6 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने दुसरी टेस्ट जानेवारी 2012 मध्ये खेळली. त्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये त्याला तिसरी टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर साहा नियमित टेस्ट क्रिकेट खेळला. या विषयावरील प्रश्नावर बोलताना साहा म्हणाला की, 'प्रत्येक खेळाडूला करियरमध्ये चढ-उताराचा सामना करावा लागणार आहे. दुखापत कधीही होऊ शकते. भुवनेश्वर कुमारचं उदाहरण घ्या, दुखापतग्रस्त होण्यापूर्वी तो टीम इंडियाकडून सर्व फॉरमॅटमध्ये खेळत होता. आता दुखापतीमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाला आहे. या गोष्टी खेळाच्या भाग आहेत." असे साहाने स्पष्ट केले. महिला क्रिकेटमधील वाद वाढला, कोच बदलण्याच्या निर्णयावर गांगुली नाराज! ऋषभ पंतबद्दल म्हणाला.. वृद्धीमान साहाने यापूर्वी 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलताना ऋषभ पंतची प्रशंसा केली आहे.  'ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे इंग्लंडमध्ये त्याला खेळवलं पाहिजे,' असं वक्तव्य साहाने केलं. प्रत्येक खेळाडूला अंतिम-11 मध्ये खेळण्याची अपेक्षा असते, पण साहाने केलेल्या या वक्तव्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, MS Dhoni

    पुढील बातम्या