मुंबई, 3 जून : टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सदस्य असलेल्या साहानं बंगाल क्रिकेट टीमकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 15 वर्षांपासून साहा देशांतर्गत क्रिकेट बंगालकडून खेळतो. बंगालची टीम आता रणजी स्पर्धेच्या नॉक आऊटमध्ये खेळणार आहे. नॉक आऊट फेरीत खेळणार नसल्याचं साहानं यापूर्वीच जाहीर केलं होतं. आता आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर त्यानं टीम सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
साहानं 2007 साली बंगालकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेली 15 वर्ष बंगालकडून तो खेळला आहे. या मोठ्या कालावधीनंतर टीमची साथ सोडत असल्याबद्दल वाईट वाटत आहे, असं साहानं सांगितलं. 'मी इतक्या प्रदीर्घ काळापासून बंगालकडून खेळत आहे. त्यानंतरही माझ्यावर ही वेळ आली याचं खूप वाईट वाटतं. माझ्या प्रामाणिकपणाबद्दल , निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करणे अत्यंत निराशाजनक आहे. एक खेळाडू म्हणून मी या परिस्थितीचा यापूर्वी कधीही सामना केला नव्हता. आता ती वेळ आली. त्यामुळे मी पुढे जाण्याचं ठरवलं.' असं साहा यावेळी म्हणाला.
'मी बंगालकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांना फोनवर या निर्णयाची माहिती दिली आहे. पण, मी त्यांना आता वैयक्तिक भेटणार आहे. त्यांच्याशी भेटून मी याबाबतची औपचारिकता पूर्ण करेन आणि एनओसी मिळवेन,' असं साहानं 'स्पोर्ट्सस्टार' शी बोलताना स्पष्ट केले.
डेटिंग नाही तर नव्या क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी होतोय Tinder चा उपयोग
काय घडले होते?
यापूर्वी ऋद्धीमान साहाची पत्नी रोमी साहाने त्याच्या बंगालची टीम सोडण्याच्या निर्णयाचं कारण सांगितलं होतं. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अधिकारी देवव्रत दास यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ऋद्धीमान साहा दुखावला आहे. दास यांनी माध्यमांसमोर येऊन साहाच्या कटीबद्धतेविषयी प्रश्न उपस्थित केले. साहा जेव्हा अडचणींमध्ये होता तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी साहाला साथ द्यायची गरज होती, पण असं झालं नाही, असं साहाच्या पत्नीने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.