क्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर युवराज नोकरीच्या शोधात, VIDEO VIRAL

क्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर युवराज नोकरीच्या शोधात, VIDEO VIRAL

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज नोकरीसाठी मुलाखत देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेल्या युवराज सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात युवराज एका नोकरीसाठी मुलाखत देत असल्याचं दिसत आहे. यामध्ये युवराज नोकरी मागण्यासाठी गेला पण त्याला बॉस ठीक न वाटल्यानं मुलाखत अर्धवट सोडून जात असल्याचं दिसतं.

व्हाय़रल होत असलेला व्हिडिओ युवराने एका वेबसिरीजमध्ये केलेल्या भूमिकेचा आहे. हॉट स्टारच्या स्पेशल सीरिज द ऑफिस इंडियामध्ये युवराज एका मुलाखतीसाठी जातो. त्यात बॉस त्याला अनेक प्रश्न विचारतात. युवराजकडे विक्री करण्याचा काही अनुभव आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा युवराजने आपण गाडी, चॉकलेट, टूथपेस्ट आणि फ्रीजसुद्धा विकला आहे असं सांगितलं. यानंतर बॉस त्याच्याकडून काही कागदांवर सही करून घेतो.

युवराजला शेवटी विचारलं जातं की, क्रिकेटला हिंदीत काय म्हणतात? यावर युवराजने सहज उत्तर दिलं की, दंड-गोल पिंड-भाग-दौड़ प्रतियोगिता. युवराजच्या या उत्तरानंतर त्याला सॅलरीबद्दल विचारण्यात आलं आणि त्यानंतर बॉसच्या बोलण्यानं युवराज चिडून मुलाखतीतून उठून जातो.

भारताला 2011 सालच्या वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहीर केली.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

First published: June 29, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading