लंडन, 18 जुलै: वर्ल्ड कप फायनलमधील ओव्हर थ्रो, सुपर ओव्हर आणि त्यानंतर इंग्लंडचे विजेतेपद यावरील वाद काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या मोठ्या स्पर्धेचा विजेता अधिक चौकार कोणी मारले यावर ठरवला जातो या गोष्टींवर अनेकांनी आक्षेप घेतले होते. इतक नव्हे तर अखेरच्या षटकात इंग्लंडला ओव्हर थ्रोवर पंचांनी सहा धावा दिल्या होत्या. या निर्णयावर चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे.
सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी समान धावसंख्या केल्यामुळे सामना टाय झाला. पण इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकार मारल्यामुळे त्यांना विजेते घोषित करण्यात आले. पण जर सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी समान चौकार मारले तर काय झाले असते. जाणून घेऊयात आयसीसीचे सुपर ओव्हरमधील नियम...
1) सर्व सामान्यपणे एखाद्या सामन्यात दोन्ही संघांनी समान धावसंख्या केली तर त्यांना समान गुण दिले जातात.
2) पण अंतिम सामन्यात असे करता येत नाही. यासाठी सुपर ओव्हरचा नियम करण्यात आला
3) सुपर ओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला तर दोन्ही संघांपेकी ज्या संघाने अधिक चौकार मारलेत त्यांना विजयी घोषित केले जाते. याच नियमाच्या आधारावर इंग्लंडने पहिला वर्ल्ड कप जिंकला.
निवृत्तीआधी 'कॅप्टन कूल' धोनीकडे BCCI ने मागितली 'ही' मदत
दोन्ही संघांनी समान चौकार मारले तर?
इंग्लंड आणि न्यूझीलंडने 50 षटकात समान धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तेथे देखील दोन्ही संघांनी समान धावा केल्या. त्यातही इंग्लंडने चौकार अधिक मारले म्हणून विजयी झाले. पण सुपर ओव्हरमध्ये चौकार देखील समान झाले तर काय होते. जाणून घेऊयात...
1) सुपर ओव्हरच्या सहाव्या चेंडूवर इंग्लंडने 6 धावा आणि न्यूझीलंडने 5 धावा केल्या असत्या तर इंग्लंडला विजयी घोषित केले असते
2) समजा सहाव्या चेंडूवर देखील दोन्ही संघांनी सारख्याच धावा केल्या असत्या तर विजयासाठी पाचव्या चेंडूवर दोन्ही संघांनी किती धावा केल्या हे पाहिले असते.
3) पाचव्या चेंडूवर ज्या संघाने अधिक धाव केली असती तो संघ विजयी ठरला असता
4) पण पाचवा चेंडू ही समान धावांचा झाला असता तर विजेता ठरवण्यासाठी चौथ्या चेंडूचा विचार केला असता. हा टाय जेव्हा संपले तेथे विजेत्या संघाची घोषणा केली जाते.
सचिन तेंडुलकरने देखील केली होती टीका
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आय़सीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीचा वर्ल्ड कप फायनलमध्ये चौकार-षटकारांच्या आधारे विजेता निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने त्याच्या अॅपवरून बोलताना सांगितलं की, मला वाटतं की दोन्ही संघांच्या चौकार-षटकारांच्या संख्येपेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळवून विजेत्याचा निर्णय व्हायला हवा होता. फुटबॉलमध्ये एक्स्ट्रा टाइममध्ये सामना जातो तेव्हा त्यांच्या आधीच्या खेळाचा विचार केला जात नाही. तसाच नियम क्रिकेटमध्येही व्हायला हवा.
सचिनने वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्येही बदलाची गरज असल्याचं सांगितलं. बाद फेरीत टॉप २ संघांच्या चांगल्या कामगिरीचा त्यांना फायदा व्हायला हवा असं म्हटलं आहे. याआधी विराट कोहलीनेसुद्धा बाद फेरीत आयपीएलप्रमाणे सामने व्हायला हवेत असं म्हटलं होतं. लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात वादग्रस्त ठरलेल्या थ्रोबद्दल आयसीसीनेसुद्धा बोलण्यास नकार दिला. त्याशिवाय पंचांच्या निर्णयावरही आयसीसीकडून मौन बाळगण्यात आलं.
देवदूत मोटरमन; ...अन्यथा 500 फूट खोल दरीत कोसळली असती एक्स्प्रेस