World Cup पराभवानंतर शास्त्रींनी टीम इंडियाला कसा दिला आधार?

भारताला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांची निराशा झाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 07:13 AM IST

World Cup पराभवानंतर शास्त्रींनी टीम इंडियाला कसा दिला आधार?

मँचेस्टर, 13 जुलै : ICC Cricket World Cup च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारत वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. या सामन्यात आघाडीचे फलंदाज फक्त 3 धावा करू शकले होते. त्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपल्या असताना जडेजा आणि धोनीने शतकी भागिदारी करत सामना जिंकण्यासाठी धडपड केली. मात्र, अखेरच्या क्षणी भारताच्या विकेट गेल्या आणि पराभव झाला. यामुळे खचून गेलेल्या भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रशिक्षक शास्त्रींनी खेळाडूंना स्वत:वर अभिमान असायला हवा असं म्हटलं.

गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीनं खेळलो आहोत त्याचा अभिमान असायला पाहिजे. इथून जाताना मान उंच करून जा. इथला खराब खेळ तुमच्या दोन वर्षांच्या मेहनतीला मिटवू शकत नाही. एक मालिका, एक स्पर्धा आणि त्यातील काही मिनिटांचा खेळ कोणताही निर्णय नाही घेऊ शकत. तुम्ही सर्वांनी मान कमावला आहे. आपण सर्वजण निराश, दुखी आहे पण यावेळी गेल्या दोन वर्षात जे मिळवलंत त्याचा अभिमान बाळगा असं सामन्यानंतर खेळाडूंना सांगितल्याचं शास्त्री म्हणाले.

भविष्याबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, आम्ही निराश आहोत पण खचलेलो नाही. आमचा संघ बलाढ्य आहे आणि जबरदस्त आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चांगला आहे. संघ योग्य मार्गावर आहे. जेव्हा तुम्ही गेल्या 30 महिन्यात इतका उत्कृष्ट खेळ केला आहे तर सेमीफायनल हारल्यानंतर निश्चितच त्रास होईल. पण हा कडू औषधाचा घोट पिणं कठीण आहे. हा खेळ आहे आणि त्यासाठीच आपण खेळतो असं शास्त्री म्हणाले.

'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 239 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. एकवेळ भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली होती. त्यानंतर धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागिदारी करून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र, 48 व्या षटकात जडेजा 77 धावांवर बाद झाला त्यानंतर 49 व्या षटकात धोनी धावबाद झाला.धोनी आणि जडेजा जोपर्यंत मैदानावर होते तोवर भारत विजय मिळवण्याची शक्यता होती.

Loading...

फक्त धोनीच नाही भारताच्या निम्म्या संघासाठी हा शेवटचा वर्ल्ड कप?

strong>VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...