World Cup : विराटने मोडला सचिन आणि लाराचा विक्रम!

World Cup : विराटने मोडला सचिन आणि लाराचा विक्रम!

ICC Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराटने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये आणखी एक विक्रम केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 37 धावा करताच सचिन आणि लाराला मागे टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 20 हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर जमा झाला आहे. कोहलीने आतापर्यंत 416 डावात (131 कसोटी, 223 वनडे आमि 62 टी-20) मिळून 20 हजार धावा केल्या. क्रिकेटमधील हा विक्रम सध्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावर जमा आहे त्यातील पहिले नाव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होय आणि दुसरे नाव आहे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा. सचिन आणि लारा या दोघांनीही 453 डावात क्रिकेटमध्ये 20 हजार धावा केल्या आहेत.

World Cup : इंग्लंडने रचलाय 'कट', कसा सामना करणार भारत?

विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमधील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारत अंतिम 4 संघातील आपले स्थान आणखी निश्चित करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन आणि लारा यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने 468 डावात 20 हजार धावा केल्या आहेत. याआधी रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने 77 धावांची खेळी केली होती. तेव्हा वनडेमध्ये सर्वाधिक वेगाने 11 हजार धावा करण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला होता. पाकविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर विराटने 57वी धाव घेताच विराटच्या 11 हजार धावा पूर्ण झाल्या होत्या. विराटने पाकविरुद्ध सचिनचा 17 वर्षापूर्वीचा विक्रम मागे टाकला.

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा झंझावात, पण 'ही' आकडेवारी धक्कादायक

वनडेत 11 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज आहे. याआधी सचिन तेंडुलकर (463 सामन्यात 18 हजार 426) आणि सौरव गांगुली (308 सामन्यात 11 हजार 353 धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने 10 हजार धावांचा टप्पा देखील सर्वात वेगाने गाठला होता.

सचिनचे अनेक विक्रम विराटच्या दृष्टीक्षेपात आहेत. विराटने वेगाने फलंदाजीत कमाल दाखवली आहे. वनडेतील सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. या विक्रमापर्यंत देखील विराट वेगाने पोहोचत आहे. सचिनने वनडेत 49 शतके केली आहेत. तर विराटने आतापर्यंत 41 शतके केली आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ 9 शतकांची गरज आहे.

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

First published: June 27, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading