World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?

World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?

ICC Cricket World Cup 2019 : धोनी आणि विजय शंकर यांच्यावर गेल्या दोन सामन्यातील कामगिरीवरून टीका केली जात आहे.

  • Share this:

लंडन, 29 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याने धोनी आणि विजय शंकरच्या कामगिरीबद्दल बोलताना त्यांचे समर्थन केलं आहे.

विराट कोहलीने विजय शंकरच्या खराब कामगिरीबद्दल बोलताना म्हटलं की, त्याच्या कामगिरीवर टीका होते याचं आश्चर्य आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्ध सुद्धा त्याचा खेळ चांगला होता.

शंकरच्या फलंदाजीबद्दल चर्चा केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तो चांगल खेळत होता पण केमार रोचच्या चेंडूवर तो बाद झाला. अजून त्याला जास्त खेळताना पाहिलं नसलं तरी तो नक्कीच चांगला खेळेल. आम्हाला विश्वास आहे तो लवकर मोठी खेळी करेल असंही विराट म्हणाला.

विराट कोहलीने पाठराखण केली असली तरी विजय शंकरची कामगिरी वेगळंच सांगत आहे. त्यानं 3 सामन्यात फक्त 58 धावा केल्या आहेत. तर त्याला एका सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. पाकविरुद्ध शंकरने दोन गडी बाद केले.

धोनीच्या खेळावरही सध्या खूप टीका केली जात आहे. पण धोनीला माहिती आहे त्याला काय हवं आहे. आमचा त्याच्यावर विश्वास आहे. धोनीची या वर्षातील कामगिरी पाहिली तर तुम्ही एक-दोन सामन्यावरून काही ठरवू शकत नाही असंही विराट म्हणाला.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading