VIDEO : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फलंदाज असा बाद झाला!

VIDEO : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फलंदाज असा बाद झाला!

ICC Cricketw world cup : स्मिथ धोनीसारखाच धावबाद झाला असला तरी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं.

  • Share this:

मँचेस्टर, 13 जुलै : ICC Cricket World Cup चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणार आहे. अंतिम फेरीत पोहचण्याआधी दोन्ही संघांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताला पराभूत केलं आहे. गुणतक्त्यात अव्वल असलेल्या या संघांना सेमीफायनलमधून बाहेर पडावं लागलं. यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला आणि तिथंच सामना भारताच्या हातातून निसटला. तशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ धावबाद झाला. चाहत्यांनी दोघांच्याही धावबाद होण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यातही स्मिथ ज्या पद्धतीने धावबाद झाला ते क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असावं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या 47 षटकांत 7 बाद 217 धावा झाल्या होत्या. 48 वं षटक ख्रिस वोक्सनं टाकलं. त्यात पहिल्याच चेंडूवर चोरटी धाव घेताना स्मिथ धावबाद झाला. इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलरच्या थेट फेकीवर स्मिथ बाद झाला.

स्मिथ नॉन स्ट्राइकला धावत होता. तेव्हा जोस बटलरने पाठिमागून मारलेला चेंडू स्मिथच्या पायांमधून गेला. स्मिथ थोडा जरी मागे किंवा पुढे असता तरी त्याच्या शरिराला चेंडू लागला असता. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असं घडल्याचं पहायला मिळालं नव्हतं.

ऑस्ट्रेलियानं दिलेलं 224 धावांचं आव्हान इंग्लंडने 32.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करून सेमीफायनलमध्ये विजय मिळवला. या विजयासह यजमान इंग्लंडने फायनलला धडक मारली असून यंदा क्रिकेट जगताला नवा जग्गजेता मिळणार आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी 124 धावांची भागिदारी करून भक्कम सुरूवात केली. जेसन रॉयनं 85 धावा करून महत्त्वाची भूमिका पार पाडली.

ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?

First published: July 13, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या