आफ्रिकेचा 9 गडी राखून विजय, आमला-डुप्लेसीनं लंकेला बुडवलं

ICC Cricket World Cup 2019 श्रीलंकेला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 10:15 PM IST

आफ्रिकेचा 9 गडी राखून विजय, आमला-डुप्लेसीनं लंकेला बुडवलं

चेस्टर ली स्ट्रीट, 28 जून: ICC Cricket World Cup हाशिम आमला आणि डुप्लेसीच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिकेनं लंकेवर विजय मिळवला. या पराभवाने लंकेच्या सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. लंकेनं 204 धावांचं आव्हान आफ्रिकेनं 38 व्या षटकांत पूर्ण केलं. डुप्लेसीने नाबाद 96 तर आमलाने नाबाद 80 धावा केल्या. सलामीवीर डिकॉकला मलिंगाने लवकर बाद केलं. मात्र, त्यानंतर आमला आणि डुप्लेसीच्या फलंदाजीसमोर लंकेच्या वाघांनी सपशेल लोटांगण घातलं.

तत्पूर्वी, आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लंकेला 50 षटकांत 203 धावांत रोखलं. लंकेकडून कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. त्याशिवाय डीसिल्वाने 24, मेंडीसने 23 आणि थिसारा परेराने 21 धावा केल्या. आफ्रिकेच्या ड्वेन प्रेटोरिअस, रबाडा आणि ख्रिस मोरिसच्या गोलंदाजीसमोर लंकन फलंदाज ढेपाळले. प्रेटोरिअस आणि मॉरिसने प्रत्येकी 3 तर रबाडाने दोन बळी घेतले. पेह्लुक्वायो आणि ड्युमिनी यांनी एक गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडविरुद्ध धक्कादायक विजय मिळवून श्रीलंकेने वर्ल्ड कपमध्ये आपले आव्हान टिकवले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ते, सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहतील.

Loading...

असा असेल श्रीलंकेचा संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

असा असेल श्रीलंकेचा संघ : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...