World Cup : गांगुलीचा विराटला सल्ला, सेमीफायनलमध्ये 'या' दोघांना संघात नको घेवू!

World Cup : गांगुलीचा विराटला सल्ला, सेमीफायनलमध्ये 'या' दोघांना संघात नको घेवू!

ICC Cricket World Cup : भारताने अखेरच्या साखळी सामन्यात लंकेविरुद्ध संघामध्ये दोन बदल केले होते.

  • Share this:

मँचेस्टर, 07 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये साखळी फेरीतील सामने संपले आहेत. सेमीफायनलला कोणत्या संघात लढती होणार हे निश्चित झाले आहे. पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 9 जुलैला पहिला सामना मँचेस्टरवर तर 11 जुलैला दुसरा सामना बर्मिंगहमवर होणार असून अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

भारताने अखेरच्या साखळी सामन्यात लंकेवर दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेनं दिलेलं 265 धावांचं आव्हान 39 चेंडू आणि 7 गडी राखून भारताने पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतके केली. तर बुमराहने तीन आणि पांड्या, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने संघात दोन बदल करत युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली होती. त्यांच्या जाही संघात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये संघात कोणाला संधी द्यायची असा प्रश्न विराटला असेल.

भारताच्या संघात सेमीफायनमध्ये कोणाला स्थान द्यायचं याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचं मत मांडलं आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवदी केदार जाधव आणि मोहम्मद शमीला संधी द्यावी असा सल्ला गांगुलीने विराटला दिला आहे. तसेच कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेण्यापेक्षा केदार जाधवला संधी दिल्यास सहावा गोलंदाज म्हणून तो उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय जडेजाही संघात असल्याने भारताकडे फलंदाजांची कुमक शेवटपर्यंत उपलब्ध राहिल असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय संघात सध्या दोन वेगवान गोलंदाज असून मोहम्मद शमीला चार सामन्यात संधी देण्यात आली होती. यात त्यानं 14 गडी बाद करून जबरदस्त कामगिरी केली होती. त्याला सेमीफायनलला पुन्हा घ्यावं असं मत गांगुलीने व्यक्त केलं आहे. भुवनेश्वर हा शेवटच्या षटकात कमी धावा देत असला तरी सेमीफायनलला तुम्हाला विकेट घेणारा गोलंदाज हवा आहे. त्यामुळे मोहम्मद शमी त्यासाठी योग्य असल्याचं गांगुलीने सांगितलं.

World Cup : फाफ डुप्लेसिसची भविष्यवाणी, फायनलमध्ये खेळतील हे दोन संघ!

सध्या भारताच्या फलंदाजीची भीस्त रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली यांच्यावर आहे. आघाडीचे हे तीन फलंदाज बाद झाले तर भारताची मधली फळी धावा करण्यात आतापर्यंत अपयशी ठरली आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत, धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव आहेत. शेवटच्या साखळी सामन्यात रविंद्र जडेजाला संघात संधी मिळाली होती. त्याने गोलंदाजी करत एक गडी बाद केला. भारताच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असून त्याला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसह फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची साथ आहे.

World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला 'हा' क्रिकेटर धोकादायक!

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading