मँचेस्टर, 11 जुलै : रनिंग बिटविन द विकेट मध्ये धोनीला कोणीही मागे टाकू शकत नाही. त्याच्या स्टम्पिगचे जितके चाहते आहेत तितकेच एकेरी-दुहेरी धावा काढताना तो ज्या वेगाने धावतो त्याचेही चाहते आहेत. मात्र, त्याचा हा वेग वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये कमी पडला आणि तो 50 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर भारताचा डाव संपायला वेळ लागला नाही आणि भारताला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.
धोनी भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही असाच सूर पुन्हा एकदा आळवण्यास सुरुवात झाली. भारतासह इतर देशातील दिग्गजांनीसुद्धा धोनी धावबाद झाल्यानंतर भारताच्या सगळ्याच आशा संपुष्टात आल्याचं म्हटलं. सोशल मिडियावर धोनीच्या संथ खेळीवर पुन्हा टीका करण्यात आली. त्यात आता पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरची भर पडली आहे. मात्र, त्यानं संथ खेळीवर नाही तर धावण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, धोनीनं धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी 100 टक्के प्रयत्न का केले नाहीत? धोनीनं डाय मारली असती तर तो धावबाद होण्यापासून वाचला असता. धोनी धावण्यात कमी पडला असं शोएब म्हणाला असला तरी त्याने धोनीचं कौतुकही केलं.
पंचांच्या चुकीचा भारताला फटका अन् धोनी झाला धावबाद?
न्यूझीलंडविरुद्ध भारताला 240 धावांचं आव्हान होतं. भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली असताना धोनी आणि जडेजाने शतकी भागिदारी करून विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 49 व्या षटकात मार्टिन गुप्टीलच्या थेट फेकीवर धोनी धावबाद झाला. यानंतर भारताचा डाव 221 धावांवर संपुष्टात आला आणि यासह भारताचे वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं.
धोनीचा फोटो काढणाऱ्यालाही आवरलं नाही रडू, पाहा VIDEO