World Cup : बांगलादेशच्या टायगरचा विश्वविक्रम, एकही खेळाडू नाही आसपास!

World Cup : बांगलादेशच्या टायगरचा विश्वविक्रम, एकही खेळाडू नाही आसपास!

ICC Cricket World Cup : शाकिबने फलंदाजीत कोहलीला मागे टाकलं तर गोलंदाजीत बुमराहशी बरोबरी केली आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : ICC Cricket World Cup च्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने अर्धशतक केलं. त्याने आतापर्यंत 4 अर्धशतकं आणि दोन शतकं केली आहेत. वर्ल्ड कपमध्ये त्याने 500 धावा पूर्ण केल्या असून यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. शाकिब हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये 500 धावा आणि 11 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. कोणताच खेळाडू त्याच्या आसपास नाही. त्याने सात सामन्यात 40 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

भारताविरुद्ध शाकिबनं 66 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने 7 सामन्यात 408 धावा केल्या आहेत. तर बुमराहने 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. कोहली फलंदाजीत सर्वोत्तम तर बुमराह गोलंदाजीत सर्वोत्तम आहे.

बांगलादेश 7 गुणांसह सध्या सातव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या संघाची कामगिरी जरी दिसण्यासारखी नसली तरी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने यंदाचा वर्ल्ड कप गाजवला आहे. मॉर्गन, रूट किंवा अॅरॉन फिंच, रोहित शर्मा, वॉर्नर यांनाही शाकिब अल हसनने मागं टाकलं आहे. पहिल्या सामन्यापासून त्याने वर्ल्ड कपमध्ये खेळात सातत्य ठेवलं आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत 542 धावा केल्या आहेत. तो दुसऱ्या स्थानावर असून भारताचा रोहित शर्मा 544 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध शाकिब अल हसनने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट घेत त्याने इतिहास रचला. वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे.

वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि 5 विकेट घेण्याची कामगिरी यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केली होती. त्याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध अर्धशतक आणि 5 विकेट घेतल्या होत्या.

बांगलादेशकडून वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेणारा शाकिब अल हसन पहिला खेळाडू ठरला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 400 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 10 विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला होता.

शाकिब अल हसनने वर्ल्ड कपमध्ये शतक आणि एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी केली आहे. भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव आणि 2011 च्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी करणारा युवराज सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा शाकिब तिसरा खेळाडू ठरला आहे.

World Cup : केदार जाधवच्या जागी जडेजाला संघात घ्यावं, सचिनचा सल्ला

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 10:50 PM IST

ताज्या बातम्या