लंडन, 06 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये आज (शनिवारी) साखळी फेरीतील अखेरचे दोन सामने होणार आहेत. पहिला सामना लीड्स मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु होईल. त्यानंतर संध्याकाळी मॅनचेस्टर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यातील चार संघांपैकी दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत तर दोन संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. तरीही हे सामने गुणतक्त्यात बदल घडवू शकतात. सेमीफायनलमधील चार संघ नक्की झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनमध्ये स्थान निश्चित केले आहे. यातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ आहेत. पण पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी अद्याप भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यात अद्याप स्पर्धा आहे. या दोन्ही संघांच्या आजच्या सामन्यांचे निकाल ठरवलतील की ते सेमीफायनमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळतील.
'हिटमॅन' रोहितकडे World Cupमधील सर्वात मोठा विक्रम करण्याची गोल्डन संधी!
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. लंकेविरुद्ध विजय मिळवल्यास 13 गुणांवर असलेल्या भारतीय संघाला 15 गुणांसह टॉपवर पोहोचता येईल. पण दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया संघाला देखील पुन्हा टॉपवर पोहोचण्याची संधी आहे. जर भारतीय संघाचा लंकेविरुद्ध पराभव झाला तर ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात अव्वलच राहिल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला तरी गुणतक्ता तसाच राहिल.
सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कोणाशी
गुणतक्त्यात भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला तर त्यांचा सेमीफायनमधील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध असेल. हा सामना 9 जुलै रोजी मॅनचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कधीही सेमीफायनलमध्ये लढत झाली नाही. जर गुणतक्त्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर त्यांची सेमीफायनमधील लढत इंग्लंडविरुद्ध होईल. हा सामना 11 जुलै रोजी बर्मिंघम येथे खेळवला जाणार आहे. 1983च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सेमीफायनमध्ये इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि त्यानंतर भारतीय संघ सर्वात प्रथम विजेता झाला होता.
VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!