SAvsSL Match Highlight VIDEO : आफ्रिकेच्या विजयानं लंकेचं आव्हान संपुष्टात

ICC Cricket world cup 2019 आफ्रिकेच्या विजयाने श्रीलंकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 11:10 PM IST

SAvsSL Match Highlight VIDEO : आफ्रिकेच्या विजयानं लंकेचं आव्हान संपुष्टात

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup हाशिम आमला आणि डुप्लेसीच्या अर्धशतकांच्या जोरावर आफ्रिकेनं लंकेवर विजय मिळवला. या पराभवाने लंकेच्या सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. लंकेनं 204 धावांचं आव्हान आफ्रिकेनं 38 व्या षटकांत पूर्ण केलं. डुप्लेसीने नाबाद 96 तर आमलाने नाबाद 80 धावा केल्या. सलामीवीर डिकॉकला मलिंगाने लवकर बाद केलं. मात्र, त्यानंतर आमला आणि डुप्लेसीच्या फलंदाजीसमोर लंकेच्या वाघांनी सपशेल लोटांगण घातलं.

तत्पूर्वी, आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लंकेला 50 षटकांत 203 धावांत रोखलं. लंकेकडून कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. त्याशिवाय डीसिल्वाने 24, मेंडीसने 23 आणि थिसारा परेराने 21 धावा केल्या. आफ्रिकेच्या ड्वेन प्रेटोरिअस, रबाडा आणि ख्रिस मोरिसच्या गोलंदाजीसमोर लंकन फलंदाज ढेपाळले. प्रेटोरिअस आणि मॉरिसने प्रत्येकी 3 तर रबाडाने दोन बळी घेतले. पेह्लुक्वायो आणि ड्युमिनी यांनी एक गडी बाद केला.

आता स्पर्धेच्या पुढच्या फेरीत कोणते संघ पोहचतील याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. ऑस्ट्रेलियाने 12 गुण मिळवत सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड तर चौथ्या स्थानी इंग्लंड आहे. असे असले तरी चौथ्या स्थानावर तीन संघ दावेदार ठरू शकतात. सध्या इंग्लंड या स्थानावर असले तरी बांगलादेश आणि पाकिस्तान हे संघही स्पर्धेत आहेत. इंग्लंडने पुढचे दोन्ही सामने गमावल्यास त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. दुसरीकडे पाकिस्ताने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बांगलादेशने उर्वरित सामन्यात विजय मिळवला तरी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.श्रीलंकेला संधी होती मात्र त्यांना आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवता आला नाही. बलाढ्य अशा इंग्लंडला नमवणाऱ्या लंकेनं आफ्रिकेसमोर सपशेल लोटांगण घातलं.

World Cup : धोनीच्या संथ खेळीवर बुमराहचा यॉर्कर!

Loading...

World Cup 2019 south africa vs srilanka -डुप्लेसीनं लंकेला बुडवलं

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 11:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...