World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या एका चुकीनं न्यूझीलंडचा विजय?

World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या एका चुकीनं न्यूझीलंडचा विजय?

ICC Cricket World Cup : आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यम्सनच्या शतकाच्या जोरावर वर्ल्ड कपमधील चौथा विजय साजरा केला.

  • Share this:

लंडन, 20 जून : ICC Cricket World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक केली. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने केलेल्या शतकी खेळीचं कौतुक होत आहे. मात्र, एका माजी खेळाडूने त्याच्यावर अखिलाडुवृत्तीचा आरोप केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 48.3 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं.

एजबस्टनवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने 138 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. त्याने या खेळीत 9 चौकार आणि एक षटकार मारला. न्यूझीलंडची होणारी पडझड रोखून केन विल्यम्सनने संघाला विजय मिळवून दिला. आता त्याच्या या खेळीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटून पॉल अॅडम्सने प्रश्न उपस्थित केला आहे. पॉलने म्हटलं आहे की, सामन्यावेळी बाद झाल्यानंतरही विल्यम्सन क्रीजवर थांबला. त्याला माहिती होतं चेंडू बॅटला लागून गेला आहे. तो मैदानाबाहेर का गेला नाही असं पॉलने विचारलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू 38 वे षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवर केन विल्यम्सनला जीवदान मिळालं होतं. त्यानंतर कोलिन डि ग्रॅण्डहोमला जीवदान मिळालं. मात्र, शेवटच्या चेंडूवर केन विल्यम्सनचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकने झेल घेतला. त्यानंतर अपिल केल्यावरसुद्धा त्याला खात्री नसल्यानं डीआरएस घेतला नाही. रिप्लेमध्ये विल्यम्सनच्या बॅटला चेंडू लागल्याचं दिसत होतं.

याबाबत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसिसने सामन्यानंतर सांगितलं की, मी त्यावेळी थोडा दूर अंतरावर होतो. डीकॉक जवळ असून त्याला लक्षात आलं नाही. तसेही मला नाही वाटत की त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला.

strong>वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

First published: June 20, 2019, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading