World Cup : विराट-सचिनलासुद्धा जमलं नाही, हिटमॅनचं विक्रमी शतक!

World Cup : विराट-सचिनलासुद्धा जमलं नाही, हिटमॅनचं विक्रमी शतक!

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध 90 चेंडूत शतक केलं. यासह त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चौथं शतक केलं आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : भारत आणि बांगलादेश यांच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मानं शतक करून विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने 90 चेंडूत शतक साजरं केल. यंदाच्या वर्ल्ड कपमधील त्याचं चौथं शतक ठरलं आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ एका सामन्यात अपयशी ठरला आहे. रोहित जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा चाहत्यांना देखील त्याच्याकडून मोठ्या खेळीचा अपेक्षा असते. वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्याचा अपवाद वगळता रोहितने प्रत्येक सामन्यात धावा केल्या आहेत. रोहित फॉर्ममध्ये असणं ही भारतासाठी मोठी जमेजी बाजू आहे. बांगलादेशविरुद्ध शतक करून रोहितनं दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकलं आहे.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीवर नजर टाकल्यास हा विक्रम सध्या 4 फलंदाजांच्या नावावर आहेत. त्यात शिखर धवन, व्हिव्हिएन रिचर्ड्स, केन विल्यमसन आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.या भारत- बांगलादेश सामन्यापूर्वी सर्वांनी इंग्लंडमध्ये प्रत्येकी 4 शतकं केली आहेत.आता इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक शतक करणारा विदेशी फलंदाज म्हणून रोहित अव्वल स्थानी पोहचला आहे.

VIDEO : बेन स्टोक्सला बॅटही उचलू दिली नाही, पाहा स्टार्कचा मास्टरस्ट्रोक

अशी आहे इंग्लंडमधील रोहितची कामगिरी

इंग्लंडमध्ये रोहित शर्मा 67 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात पाच शतकी खेळींचा समावेश आहे. सरासरीचा विचार करता इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत रोहित केन व्हिल्यमसनच्या मागे आहेत. इंग्लंडमध्ये केनची सरासरी 79.20 इतकी आहे. जर रोहितने इंग्लंडमध्ये असाच फॉर्म कायम ठेवला तर सरासरीबाबत तो सर्वांच्या पुढे जाईल.

2019 चा वर्ल्डकप...

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने वॉर्नरला (500 धावा ) मागे टाकलं आहे.रोहितनं आतापर्यंत चार शतकं केली आहेत. रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 122, पाकिस्तानविरुद्ध 140 आणि इंग्लंडविरुद्ध 102 धावा केल्या होत्या. आता भारताचा एक सामना शिल्लक आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारत सेमीफायनलचं तिकीट पक्कं करेल. त्यानंतर श्रीलंकेसोबत 6 जुलैला सामना होणार आहे.

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या